पुणे (हवेलीनामा ऑनलाईन) गुन्हे शाखेच्या युनिट 6 पथकास माहिती मिळाली की,पुणे अहमदनगर महामार्गावरील लोणीकंद येथे दोन जण गांजा विक्रीसाठी येणार आहेत यावर पोलीस निरीक्षक गणेश माने यांनी आपल्या पथकासह त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 22 किलो गांजा ज्याची बाजारभावानुसार किंमत रु 4,50,000 इतकी आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन व्यक्ती त्यांच्याकडील महिंद्रा स्कार्पिओ गाडीमधून गांजा विकण्याकरिता पूणे येथे येणार आहेत अशी खात्रीशीर

बातमी गुन्हे शाखेच्या युनिट 6 मधील पथकास मिळाली.

त्यानुसार पोलीस निरीक्षक गणेश माने यांनी स्वतः पोलीस पथकासह बारावा मैल, लोणीकंद, पुणे येथे सापळा रचुन हनुमंत भाऊसाहेब कदम, रा. मु.पो. कुसडगाव, ता. जामखेड, जि. अहमदनगर, व तुषार संजय झांबरे, रा. मु. हिंगणी, पो.टाकळसिंग,ता.आष्टी, जि. बीड यांना त्यांच्याकडील महिंद्रा स्कार्पिओ गाडीसह ताब्यात घेवून, त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे गाडी मध्ये पांढ-या पोत्या मध्ये ठेवलेला एकुण ४,५०,०००/- रूपये किंमतीचा २२ किलो गांजा सापडला व गांजा विक्री करण्याकरिता महिंद्रा स्कार्पिओ गाडी वापरल्याने ४,००,०००/-रु किंमतीची गाडी असा एकूण ८,५०,००० /- रुकिचा मुद्देमाल जप्त करून लोणीकंद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी ही पोलीस आयुक्त, अमिताभ गुप्ता,

सह आयुक्त, संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, रामनाथ पोकळे,.पोलीस उपआयुक्त, गुन्हे शाखा, श्रीनिवास घाडगे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे – २, नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट-६ चे पोलीस निरीक्षक गणेश माने, सहा. पोलीस निरीक्षक, नरेंद्र पाटील, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे,रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, नितीन शिंदे, ऋषीकेश टिळेकर, शेखर काटे, प्रतिक लाहिगुडे, ऋषीकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषीकेश ताकवणे, नितीन धाडगे, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली

आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *