लोणी काळभोर (हवेलीनामा ऑनलाइन) जिल्ह्यातील कोरोनाच्या लसीकरण मोहिमेत लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्र अव्वल स्थानी ठरले.तसेच ग्रामीण भागातील लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी बजाज ग्रुपने कोव्हिशिल्डचे डोस उपलब्ध करुन दिले.या अंतर्गत कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीकडून मंगळवारी ठिकठिकाणी एकूण १७०० नागरिकांना कोविशिल्डचे लसीकरण करण्यात आले.
संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा एक विक्रम ग्रामपंचायत कदमवाकवस्ती मध्ये झाला आहे,असे प्राथमिक आरोग्य केंद्र,लोणी काळभोर येथील अधिकारी डॉ जाधव यांनी सांगितले. ही मोहीम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अंबिका ग्रुप,परिवर्तन फौंडेशन, जयहिंद ग्रुप,कै.नवनाथ साळूखे मित्र परिवार,ग्रामपंचायत सदस्य सचिन दाभाडे,नासिर पठाण,राजश्री काळभोर,वंदना काळभोर तसेच सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर नामुगडे,अविनाश बडदे,प्रसाद कदम,तंटामुक्ती अध्यक्ष विकास कदम,अभिजित बडदे मित्र परिवार,शब्बीर पठाण मित्र परिवार,पोलीस पाटील प्रियंका भिसे व ग्रामपंचायत कदमवाकवस्ती चे कर्मचारी,याबरोबरच प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर,नर्स,आरोग्य कर्मचारी सर्वांचे योगदान या लसीकरण मोहिमेत मिळाले. कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या कार्यक्षम सरपंच गौरी चित्तरंजन गायकवाड त्याचप्रमाणे परिवर्तन फौंडेशनचे अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड यांचे अतिशय मोलाचे योगदान या लसीकरण मोहिमेत लाभले.आज जवळपास १७०० नागरिकांचे यशस्वी लसीकरण पार पडले. रात्री ९ वाजे पर्यत ही मोहिम चालू होती आणि ग्रामपंचायतिच्या सहकार्याने खालील ४ ठिकाणी लसीकरण कॅम्प आयोजित केले होते,जेणेकरून नागरिकांचा गोंधळ होऊ नये ,त्यांची गैरसोय होऊ नये याची सर्व जबाबदारी सरपंचांनी घेतलेली होती.
1) कवडीमाळवाडी जि. प. शाळा – ४०० डोस
2) संभाजीनगर एंजल हायस्कुल – ४०० डोस
3) कदमवस्ती जि. प. शाळा – ४०० डोस
4) कदमवाकवस्ती पालखीस्थळ अंगणवाडी – ५०० डोस
या ४ ही ठिकाणी लसीकरण पूर्ण झाले , कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून जर आपणा सर्वांना सुखरूप बाहेर पडायचं असेल तर लसीकरण खूप गरजेचे आहे यासाठी कदमवाकवस्ती हद्दीतील लस न घेतलेल्या सर्व नागरिकांनी लवकरात लवकर लस घेऊन या कोरोना पासून वाचायचं आहे असे आवाहन सरपंच गौरी गायकवाड यांनी यावेळी केले.
