पुणे (हवलीनामा ऑनलाईन) अमृत्सर येथून पार्सल मध्ये आलेल्या 97 तलवारी पिंपरी चिंचवड पोलिसांनी जप्त केल्या असून या प्रकरणी दिघी पोलीसात  चौघा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डी पी डी सी कुरिअर च्या गोदामात अमृत्सर वरून आलेल्या पार्सल मध्ये तलवारी सदृश्य वस्तू असल्याचे कर्मचाऱ्यास दिसून आल्याने त्यांनी ताबडतोब याची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी ते पार्सल ताब्यात घेऊन उघडल्यानंतर त्यात तलवारी असल्याचे आढळून आले.

         अलीकडच्या काळात ऑनलाइन पार्सल च्या माध्यमातून घातक शस्त्रे मागविण्याचे प्रमाण उघडकीस आलेले असून गेल्या महिन्यात 30 मार्च रोजी औरंगाबाद मध्ये डीटीडीसी कुरिअर मार्फत झालेल्या पार्सलमध्ये तलवारी आढळून आल्या होत्या त्यानुसार पिंपरी चिंचवड येथील पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व पोलीस ठाणे यांनी कुरियर व्यवसायिकांना येणाऱ्या पार्सलची स्कॅनिंग करावे अशा सूचना दिलेल्या आहेत
         दिनांक 1 एप्रिल रोजी डीटीडीसी कुरिअर च्या गोदामात रंजीत कुमार सिंग पार्सल ची तपासणी करत होते त्यावेळी त्यांना अमृतसर हुन पाठविण्यात आलेल्या दोन खोक्यांमध्ये तलवारी सदृश्य वस्तू असल्याचे जाणवले त्यांनी याप्रकरणी माहिती तात्काळ दिघी पोलिसांना दिली पोलिसांनी हे खोके उघडून पाहिले असता त्यात तलवारी असल्याचे दिसून आले हे खोके उमेश सूद, अमृतसर, पंजाब या व्यक्तीने औरंगाबाद येथील अनिल होन नावाच्या व्यक्तीस पाठवले होते.
        या घटनांमध्ये ज्या व्यक्तीने पार्सल पाठवले व ज्या व्यक्तीच्या नावे पार्सल आले अशा चौघांच्या विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *