थेऊर (हवेलीनामा आॕनलाईन) अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या थेऊर गावात यावर्षी प्रथमच एक गाव एक शिवजंयती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते व ही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यामध्ये विविध शिवकालिन मर्दानी खेळांचे प्रत्यक्षिक बालकलाकाराने सादर केले यावेळी उपस्थित शिवभक्ताच्या डोळ्याचे पारणे फेटले तिथीनुसार २१तारखेला शिवजयंती निमित्तानं भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात तरुण शिवभक्तांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून रक्तदान केले यात १५१ शिवभक्तानी रक्तदान केले तसेच जेष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी केले.
        थेऊर येथील शिवप्रेमी तरुणांनी मोठा उत्साह दर्शवला यासाठी छञपती संभाजीमहाराज यांचे जन्म ठिकाणी असलेल्या किल्ले पुरंदर येथून शिवज्योत आणली सकाळी नऊ वाजता शिवज्योतीचे गावात आगमन झाले यावेळी आखिल थेऊरगाव शिवजयंती महोत्सव कमिटीच्यावतीने उत्फूर्त स्वागत करण्यात आले सकाळी छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला गावातील निवृत्त लष्करी सैनिकांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन पूजन करण्यात आले.सकाळी अकरा वाजता गावातील चिंतामणी प्रासादिक भजनी मंडळाने भजन केले आणि पाळणाचे गायन करुन शिवजन्मोत्व साजरा केला सायकांळी छञपती शिवाजी महाराजांची अश्व रथामध्ये पारंपरिक मिरवणूक काढून ग्रामप्रदक्षिण पूर्ण केली यावेळी पांरपारिक वाजंञी तसेच ढोलताशांचा गजर संभळ वाजून मिरवणूक काढली यावेळी गावातील सर्व तरुण शिवभक्तासह अबालवृध्द गावातील महिलांनी या मिरवणूकीत मोठ्या संख्येने  उपस्थिती लावली तर अनेक शिवभक्तांनी पारंपारिक वाद्यवर ठेका धरला मिरवणूकीत मर्दानी खेळामुळे शिवभक्तांनी शिवकालिन परंपरा अनुभवली मिरवणूकीत उंट घोडेवर बसून बाल शिवभक्तनी ग्रामप्रदक्षिणापूर्ण करुन एक गाव एक शिवजयंती थेऊरमध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *