थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन )कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षापासून अनेक सार्वजनिक उत्सवावर निर्बंध लावण्यात आले होते परंतु यावर्षी यात सुट दिल्याने हे उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे होत आहेत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या जयंतीनिमित्ताने तरुणाईत मोठी वीरश्री संचारते,पूर्व हवेलीतील कोलवडी साष्टे शिवजयंती समितीच्या वतीने आज शनिवारी भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते यात 115 बाटल्या रक्त गोळा झाले.

          जवळपास सर्वच गावात अशाच प्रकारे आनंदोत्सव साजरा होत आहे कोलवडीत तीन दिवसीय उत्सव साजरा होत असून उद्या रविवारी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत तर परवा सोमवारी तिथीनुसार शिवजयंती असल्याने दुपारी भजन व सायंकाळी शिवज्योतीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.तसेच रविवारी सायंकाळी सिंहगडावरुन शिवज्योत आणण्यासाठी प्रस्थान होणार आहे.
       आज पार पडलेल्या रक्तदान शिबिरात तरुणांसह गावातील जेष्ठ पदाधिकाऱ्यांनीही रक्तदान करून सहभाग घेतला त्यामुळे त्यांच्यात अधिकच उत्साह निर्माण झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *