पुणे (हवेलीनामा ऑनलाईन) गेली दोन वर्षापासून स्वतःची ओळख लपवून वारंवार जागा बदल घेऊन पोलिसांना गुंगारा देणारा सराईत गुन्हेगार लोणी काळभोर पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडून त्याचा अटक केली आहे

        लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट 2020 मध्ये पेठ गावातील चेतन उर्फ मयूर रामदास शेलार याने सुधाकर पोपट आडागळे यांना रस्त्यात अडवून तसेच घरी जाऊन मला गुलाल का लावला याचा राग मनात ठेऊन आडागळे यांच्या डोक्यात कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला यात ते गंभीर जखमी झाले होते.यावरुन त्याच्याविरुद्ध लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
       मयूर शेलार तेव्हापासून पोलिसांना गुंगारा देत असे वारंवार जागा बदलून स्वतःची ओळख गुप्त ठेवत होता.त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक मदत घेतली परंतु तो कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरत नसल्याने त्याचा शोध घेणे अवघड होत राहीले परंतु पोलिसांना त्याच्या विशेष खबऱ्याकडून माहिती मिळाली त्यानुसार त्यास सापळा रचून अटक करण्यात आली.
       ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी,गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे,पोलीस हवालदार सोनवणे,विजय जाधव, पोलीस नाईक दिगंबर जगताप महेश भोंगळे व विशाल बनकर या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *