थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) माध्यमीक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे आज पासून सुरुवात झाली शैक्षणिक बोर्डाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार यावर्षी परीक्षार्थी विद्यार्थ्यांना अन्य कोणत्याही केंद्रावर जाऊन परीक्षा देण्याची वेळ नाही ही त्यांना आपल्याच शाळेत परीक्षा देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आहे त्यानुसार थेऊर येथील चिंतामणी विद्या मंदिर केंद्राअंतर्गत असलेल्या ग्रामीण सर्वांगीण विद्यालय कुंजीरवाडी तसेच म्हातोबा माध्यमिक विद्यालय आळंदी म्हातोबा येथील शाळेत दहावीच्या परीक्षेत आज सुरुवात झाली.

           चिंतामणी विद्यालयाचे प्राचार्य तथा केंद्र संचालक बाळासाहेब नेवाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार शैक्षणिक बोर्डाच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांना यावेळी अर्धा तास आगाऊ देण्यात येत असून सकाळी साडे दहा ते दोन यादरम्यान परीक्षा घेण्यात येत आहे थेऊर येथे चिंतामणी विद्यामंदिरात एकूण 85 विद्यार्थी परीक्षेला बसलेले असून म्हातोबा विद्यालयात 65 विद्यार्थी तर ग्रामीण सर्वांगीण विद्यालय 115 विद्यार्थी तसेच यशवंतराव चव्हाण इंग्लिश मीडियम स्कूलचे 20 विद्यार्थी परीक्षेस बसलेले आहे आज दि. 15 मार्च रोजी पहिला मराठी विषयाचा पेपर असल्याने केवळ मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांचा पेपर होता.येथील चिंतामणी विद्यालयात परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.तणावमुक्त परिक्षा पार पाडावी यासाठी विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आहे.थेऊर परिक्षाकेंद्रावर सहाय्यक परिरक्षक म्हणून शब्बीर मुजावर, उपकेंद्रप्रमुख  मधुकर खरात, तसेच परिक्षा समन्वयक जीवन शिंदे व शांताराम काटकर हे कार्यरत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *