सातारा (हवेलीनामा आॕनलाईन) देशाची सेवा करण्याचे भाग्य मिळणे ही खरोखरच दैवी देणगी आहे.आपल्या सैनिकांचे हे महत्कार्य अवर्णनीय आहे त्यांच्याबद्दल कायम आदरभाव आपल्या मनात असतो.भारताच्या इतिहासात महाराष्ट्र राज्याची एक वेगळी ओळख आहे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याला पुरातन काळापासून एक शौर्याची भुमी म्हणून ओळख आहे या भुमीचा साधारणतः तीनशे चारशे वर्षापासूनचा इतिहास आहे यात अंखड हिंदुस्तानचे अराध्य दैवत छञपती शिवाजी महाराजाची पविञ भूमी ज्यानी या भारतमातेचे रक्षण करुन स्वराज्याची स्थापना केली अशा या पविञ भुमी सातारा जिल्ह्याचा आज इतिहास कायम आहे या जिल्ह्याची ओळख आता सैनिकांचा जिल्हा म्हणून आहे येथील प्रत्येक गावातील तरुणाईत भारत मातेच्या रक्षणासाठी सैन्यात भरती होऊन देश रक्षणाची झिंग चढलेली आहे.
तसा सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुका हा सर्वच बाबतीत सधन त्यात शेती प्रधान तालुका यातील रणदुल्लाबाद गावातील यशवंत चंद्रकांत जगताप यांनी आपली सैन्यदलातील सतरा वर्षे सेवा केली आणि ते जेंव्हा आपल्या मुळगावी परतले यावेळी गावातील सर्वांनी या वीर जवानाचे पारंपारिक वाद्य हलगी ताशाच्या गजरात गावातून मिरवणूक काढली यावेळी गावातील मिञ परिवाराने हारतुरे फुलांचे गुच्छ देऊन स्वागत केले तर माहिलानी त्यांचे औक्षण करुन या गावच्या सुपुञाचे स्वागत केले
यशवंत जगताप यांचा मोठा नागरी सत्कार करण्यात आला यावेळी भारत माता की जय वंदे मातरम् अशा घोषणा देऊन गावात भारतमातेचा जयजयकारांनी परिसर दणाणून सोडला गावातील प्रत्येक घरासमोर रांगोळ्यांच्या पायघड्या घालून स्वागत केले.
