पुणे (हवेलीनामा ऑनलाईन)    लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील होळकरवाडी गावात जून 2021 मध्ये घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी 30 ग्रॅम सोन्याचे दागिने घरफोडी करून चोरून नेले होते या गुन्ह्याचा तपास लोणी काळभोर पोलिसांनी लावला असून याप्रकरणी तीन व्यक्तीस अटक केली असून त्यांच्याकडून एक लाख 50 हजार रुपये किमतीचे 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.

     लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, होळकरवाडी परिसरात राहणारे यालाप्पा कलाप्पा सन्नके यांच्या घरातून जून 2021 मध्ये अज्ञात चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून घरातील 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने घरफोडी करून चोरून नेले होते या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी लोणी काळभोर  पोलीसांनी तपास पथकास आदेश देऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर पोलीस आमलदार यांना सूचना केल्या त्यानुसार पोलीस आमलदार नितीन गायकवाड व सुनील नागलोत यांना हा गुन्हा सराईत गुन्हेगार शाहरुख पवार व त्याच्या भावांनी केला असून ते वडकी परिसरात असल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांना याची माहिती देऊन त्यांच्या सूचनेनुसार साहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर व पोलीस अंमलदार यांनी वडकी परिसरात सापळा रचून शाहरुख विजय पवार त्याचा भाऊ बाजा विजय पवार व देवगुन विजय पवार यांना शिताफीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली त्यावेळी त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिली त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरी गेलेला माल  30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून यातील देवगुन विजय पवार हा लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या घरफोडी गुन्ह्य़ात पाहिजे असलेला गुन्हेगार आहे
        ही कारवाई हडपसर चे सहाय्यक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर, दिगंबर बिडवे तसेच पोलीस हवालदार नितीन गायकवाड, पोलीस नाईक सुनील नागलोत, श्रीनाथ जाधव, संभाजी देविकर, दिगंबर साळुंखे यांच्या पथकाने केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *