पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) गेली आठवडाभर होत असलेल्या टिकेनंतर खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी गांधी पुण्यतिथीच्या पूर्व सांधेला आळंदी येथील महात्मा गांधी यांच्या स्मारकावर जाऊन आत्मक्लेश केले.

       अमोल कोल्हे यांनी एक कलाकार म्हणून अनेक भूमिका केल्या परंतु त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली ती छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेमुळे त्यांनी या भूमिकांमधून महाराजांचा खरा इतिहास घराघरात पोहोचवला परंतु त्यांनी व्हाय आय किल्ड गांधी या चित्रपटात साकारलेली नथुराम गोडसे यांची भूमिकेवरून त्यांच्यावर चौफेर टीकेची झोड उठवली गेली.गेल्या आठवडाभरात त्यांच्यावर प्रचंड दबाव निर्माण झाला शेवटी आज त्यांनी आळंदी येथील इंद्रायणी काठी असलेल्या महात्मा गांधी यांच्या स्मारकावर जाऊन आत्मक्लेश केले व सर्वांची दिलगिरी व्यक्त केली.
        डॉ कोल्हे म्हणाले की, सम्पूर्ण आठवडाभर माझ्याकडे अनेक कार्यकर्ते आले त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या की आम्ही आपणास एक शिवभक्त म्हणून ओळखतो आपल्याकडून अशी प्रतिगामी भूमिका अपेक्षित करत नाही त्यामुळे सर्व गांधीवादी व पुरोगामी विचाराच्या व्यक्तींची मी दिलगिरी व्यक्त करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *