पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) वास्तववादी पत्रकारीता करणे हे सद्यस्थितीत आव्हानात्मक काम असून पत्रकारांनी हे काम प्रामाणिकपणे केले तर समाज त्यांच्या पाठीशी निश्चित उभा राहील केवळ राजकीय बातम्यांना महत्त्व देऊन हे काम साध्य होणार नाही तर समाजातील वेगवेगळ्या प्रश्नांना वाचा फोडून ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत असे विचार जिल्हाध्यक्ष सिताराम लांडगे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली हा दिवस पत्रकार दिन म्हणून राज्यात साजरा केला जातो आज लोणी काळभोर येथील जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी मुंबई महापौर केसरी दत्तात्रेय उर्फ आबा काळे यांच्या हस्ते जांबेकर यांच्या तैलचित्राचे पूजन करण्यात आले यावेळी लोणी काळभोर चे सरपंच श्री राजाराम काळभोर, जिल्हा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सिताराम लांडगे, लोणी काळभोर चे गाव कामगार तलाठी दादासाहेब झंजे तसेच हवेली तालुका अध्यक्ष पंढरीनाथ नामगुडे, कार्याध्यक्ष तुषार काळभोर, उपाध्यक्ष गणेश धुमाळ,सरचिटणीस ज्ञानेश्वर शिंदे, सचिव विजय रणदिवे, सहसचिव दिगंबर जोगदंड,राम भंडारी,प्रवीण शेडगे,आबा कुंजीर, वैभव कुंजीर, गौरव कुंजीर तसेच हवेली तालुका पत्रकार संघाचे सन्माननीय सदस्य उपस्थित होते.
