थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या अनुयाना वाहनांचा अडथळा होऊ नये यासाठी थेऊरफाटा – थेऊर – लोणीकंद हा मार्ग उद्या शुक्रवार दिनांक ३१ डिसेंबर सायंकाळी ५ वाजल्यापासून दिनांक २ जानेवारी सकाळी आठ वाजेपर्यंत अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आलेला आहे, अशी माहिती लोणी काळभोर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे यांनी दिली

        कोरेगाव भीमा येथे एक जानेवारी रोजी महाराष्ट्रासह देशातून असंख्य अनुयायी अभिवादन करण्यासाठी येत असतात महाराष्ट्राच्या दक्षिण भागातून येणारे विशेषतः सोलापूर उस्मानाबाद सातारा या जिल्ह्यातील अनुयायी पुणे-सोलापुर महामार्गाने येऊन पुढे थेऊर फाटा थेऊर लोणीकंद असा प्रवास करतात येणारे अनुयायी मोठ्या संख्येने वाहने घेऊन येतात त्यामुळे या वाहनांना अवजड वाहनांचा अडथळा येऊ नये यासाठी पोलीस विभागाकडून या मार्गावरील अवजड वाहतूक उद्या शुक्रवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आलेली आहे या वाहनांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे शहर वाहतूक शाखेकडून कळविण्यात आलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *