थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) गेल्या तीन वर्षापासून गटाराचे पाणी शेतात सोडल्याने शेती नापिक झाली आहे त्याची नुकसान भरपाई देऊन ती गटार लाईन त्वरित बंद करण्याची मागणी ग्रामपंचायतकडे करत ग्रामसभेत हा मुद्दा उपस्थित करून ग्रामपंचायत गांभीर्याने घेत नाही, विहिरीचे पाणी दूषित झाल्याने कुटुंबाचे आरोग्य धोक्यात आले आहे अशी कोलवडी ग्राम सभेमध्ये एका शेतकऱ्यांनी कैफियत मांडून शेतीच्या नुकसान भरपाईची मागणी केली यावर ग्रामपंचायत प्रशासनाकडे कोणतेही उत्तर नसल्याने ग्रामसभेत एकच गोंधळ उडाला

          कोलवडी ग्रामपंचायत पाणी शुद्धीकरण प्रकल्पातील उपयुक्त नसलेले टाकाऊ पाणी रस्त्यावर वाहत असल्याने रस्त्याचे नुकसान होत असल्याने ते बंद नळीतून वाहून नेण्यासाठी गटार बांधकाम करण्यात आले ते पाणी पुढे एका शेतकऱ्याच्या शेतात सोडलेले होते या गटार लाईन मध्ये अनधिकृत रित्या काही जणांनी मैल मिश्रित पाणी सोडले विशेष म्हणजे येथे एका विकासकाने विनाप्रक्रिया अशुद्धपाणीची लाईन या गटाराला जोडल्याने या पाण्याची दुर्गंधी येत आहे यात कोणाचे हात ओले झाले आहेत का हा प्रश्न उपस्थित झाला कारण हेच पाणी पुढे या शेतकऱ्याच्या शेतात पिकांचे नुकसान करत असून  विहिरीतील पाणी दूषित करत आहे जे पाणी घरात पिण्यासाठी व वापरासाठी उपयोगात आणले जाते त्यामुळे हे गटार त्वरित बंद करण्याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी वारंवार ग्रामपंचायत प्रशासनाकडे याबाबत तक्रार केली. परंतु केवळ वेळ मारून नेण्याचे काम चालू आहे,किंवा हे जाणूनबुजून केले जात असल्याचा आरोप केला आहे
       काही दिवसांपूर्वी महसुली वसुली वाढविण्यासाठी घरपट्टी थकबाकीदारांना लोक आदालत न्यायालयाची नोटीस बजावण्यात आली या शेतकऱ्याने गटार लाईनचे पाणी बंद करा त्यानंतरच घरपट्टी भरतो असे सांगितले होते त्यामुळे या शेतकऱ्यास सुद्धा थकबाकी संदर्भात नोटीस देण्यात आली होती त्यावर त्या शेतकऱ्याने न्यायालयात हा मुद्दा उपस्थित केला, त्यावेळी न्यायाधीशांनी संबंधितावर म्हणजेच सरपंच ग्रामसेवक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणे संदर्भात सांगितले ही बाब त्या शेतकऱ्यांनी ग्रामसभेत मांडली याला ग्रामसेवक यांनी दुजोरा दिला यावरून ग्रामपंचायत कडून अक्षम्य अशी चूक होत असल्याचे स्पष्ट होते.

        तसेच ज्या विकासकाने या गटार लाईनमध्ये मैला पाणी सोडले त्यास कोणत्या अटीशर्तीवर परवानगी देण्यात आली याची माहिती त्या शेतकऱ्याने मागितली बांधकाम करण्यासाठी पी एम आर डी ए कडून घालून देण्यात आलेल्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आहे किंवा नाही याची माहिती मिल्ने आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *