पुणे (हवेलीनामा ऑनलाइन)  राज्यातील तसेच देशातील सहकार चळवळ संपुष्टात येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे ती वाचवण्यासाठी कोणत्याही समित्याची स्थापन केली जाणार नाही.अगोदरच्या समित्यांचा आलेख पाहता सहकार वाचवण्यासाठी आम्ही कोणत्याही समित्या नेमणार नाहीत, असे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी अहमदनगर येथील सहकार परिषदेत स्पष्ट केले. अमित शहा यांच्याकडे केंद्रीय सहकार मंत्री पद आल्या नंतर देशातील पहिली सहकार परिषद अहमदनगर येथील प्रवरनगर परिसरात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. ही चळवळ वाचवण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याविषयीचे नियोजन त्यांनी मांडले.

सहकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, आम्ही यासाठी समित्या स्थापन करणार नाहीत तर सहकार क्षेत्राचा अनुभव असलेल्या विद्वानांसोबत काम करू. वित्त, साखर कारखाने, वितरण, मार्केटिंग, दूध इत्यादी सर्वच क्षेत्रांसाठी ही रणनीती लागू असेल.’तर सहकार क्षेत्र काळानुरूप अनुकूल बनवावे लागेल.तसेच प्रशासनाचे, पद्धतींचे आधुनिकीकरण करावे लागेल. सर्व व्यवहार संगणकीकरण करावे लागतील, कर्चमाऱ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्य असणाऱ्यांना योग्य सन्मान द्यावा लागेल, कुशल कर्मचाऱ्यांना जे बाहेर मोबदला मिळतो त्याचा विचार करून त्यांना तो द्यावा लागेल व स्पर्धेत उतरवाले लागेल त्यानंतरच सहकाराची चळवळ ५० ते १०० वर्षे पुढे नेता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *