राजगुरुनगर  (हवेलीनामा ऑनलाइन)  येथील दत्त विश्वस्त मंडळाच्या दत्तमंदिरात ( भिमातीरी) प्रतिवर्षीप्रमाणे दत्तजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहे. अशी माहिती दत्त विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष प्रताप आहेर यांनी दिली. हा सोहळा शुक्रवार (दि. १७) ते रविवार (दि.१९) पर्यंत होणार आहे.
शुकवारी सकाळी आठ वाजता अभिषेक व महापूजा, गायत्री महायज्ञ , प्रेमध्वज पुजन सायंकाळी पाच वाजता श्रींच्या प्रेमध्वजाची मिरवणूक व दत्त मंदिर येथे ध्वजारोहण होणार आहे. शनिवारी ( दि. १८) सकाळी श्रींची महापूजा व मंत्रजागर ,दुपारी संगीत भजन, तर सायंकाळी दत्त जन्मावर ह.भ.प. विठ्ठल महाराज गुंडाळ ( बीबी ) यांचे प्रवचन होणार आहे. त्यानंतर श्री दत्तजन्म सोहळा साजरा केला जाणार आहे. रात्री पालखी ग्रामप्रदक्षिणा, भजन , आरती व प्रसाद असे कार्यक्रम होणार आहे. रविवारी ( दि.१९) दुपारी दत्त विश्वस्त मंडळाचे भजन, सामूहिक मंत्रजप ,आरती व महाप्रसाद असे कार्यक्रम होऊन उत्सवाची सांगता होणार आहे.
कार्यक्रमाचे संयोजन अध्यक्ष प्रताप आहेर, अजित डोळस, नथुराम तनपुरे, रवींद्र जोशी, पांडुरंग साळुंखे, श्रीमती कमल पिसाळ, प्रभाकर जाधव, अशोक दुगड अादी करत आहेत.
तसेच राजगुरुनगर एसटी आगारातील दत्तमंदिरात एसटी अवधूत मंडळाच्यावतीने प्रतिवर्षीप्रमाणे दत्त जयंती साजरी होणार आहे. यानिमित्त गुरुचरित्र पारायणास प्रारंभ झाला असून गुरुचरित्राची प्रत मंडळाच्या वतीने देण्यात येत आहे. अशी माहिती चिंतामण गोसावी व पांडुरंग शिंदे यांनी दिली. भाविकांनी कोरोनाच्या संकटामुळे देवदर्शनास येताना मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सचे पालन करावे, गर्दी करणे टाळावे आणि रांगेत सामाजिक अंतर राखून दर्शन घ्यावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *