पुणे (हवेलीनामा ऑनलाइन)
धर्मनिरपेक्षतेचे गोडवे गाऊन आजपर्यंत तुमची मते घेतली पण त्यातून तुम्हाला काय मिळालं? या धर्मनिरपेक्षतेने तुम्हाला काय दिलं? मी केवळ संविधानातील धर्मनिरपेक्षता मानतो. राजकिय धर्मनिरपेक्षता अजिबात मानत नाही. तुम्ही सुद्धा ती धुडकावून लावा, असं आवाहन एम आय एम चे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी
एमआयएमच्या वतीने तिरंगा रॅली काढण्यात आली होती तिच्या सांगता सभेत चांदिवली येथे त्यांचे भाषण झाले. यावेळी असदुद्दीन ओवैसी यांनी धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार प्रहार केला. तसेच महाविकास आघाडीवरही त्यांनी जोरदार हल्ला चढवला. कुठे आहे आरक्षण? तुम्ही आम्हाला मतदान केलं नाही. तुम्ही कुणालाही मतदान करावं हा तुमचा हक्क आहे. पण तुम्ही कधीपर्यंत फसवले जाणार आहात. बाबरी मशिद पडल्यानंतर मुंबईत हिंसाचार झाला त्यानंतर तरी तुमचे डोळे उघडायला हवे होते. पण तुम्ही सर्व विसरला, असं ओवैसी म्हणाले
तुम्हाला धर्मनिरपेक्षता दाखवली गेली. भारतातील मुसलमानांना मी विचारू इच्छितो धर्मनिरपेक्षतेने तुम्हाला काय मिळालं? धर्मनिरपेक्षतेने तुम्हाला केवळ घोषणा दिल्या, आश्वासने दिले, पण आरक्षण मिळालं नाही, मशीद मिळाली नाही. मशिद पाडणाऱ्यांना शिक्षा मिळाली नाही. न्याय मिळाला नाही. पण तरीही आपण धर्मनिरपक्षेतेच्या गोड भूल थापाना भुलतो.
धर्मनिरपेक्ष या शब्दाने जेवढा धोका दिला तेवढ्या कोणत्याही शब्दाने दिला नाही. ओवेसी येणार आहेत. त्यामुळे धर्मनिरपेक्षला धोका पोहोचेल. तो धोक्यात येईल असं सांगितलं जात आहे. याचा ठेका काय तुम्हीच घेतला आहे का? असा सवालही त्यांनी केला.
संविधानाचा दाखला देत त्यांनी मागणी केली की, आरक्षण आपल्याला हवं आहे. संविधानाने मुलभूत अधिकार दिले आहेत. त्यात सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत त्यांना आरक्षण देण्याची तरतूद आहे. तुम्ही कुणालाही आरक्षण द्या. त्याला आमचा विरोध नाही. पण न्यायालयाने सांगितल्यानंतरही आम्हाला आरक्षण दिलं जात नाही असं का? मुसलमाना बाबत इतका दुजाभाव का? असा सवाल त्यांनी केला.
यावेळी त्यांनी मुस्लिम आणि मराठा समाजाचं शिक्षण आणि नोकरीतील प्रमाण याची आकडेवारी दिली. तसेच मराठ्यांपेक्षा मुस्लिम किती मागास आहेत हे दाखवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. महाराष्ट्रात ४.९ टक्के मुसलमान पदवीधर आहेत. तर ८.९ टक्के हिंदू पदवीधर आहेत. ख्रिश्चन २२ टक्के पदवीधर आहे. तुम्ही फक्त ४ टक्के पदवीधर आहात. महाराष्ट्रात २२ टक्के मुस्लिम मुले प्राथमिक शाळेत शिक्षण घेत आहेत. माध्यमिक शाळेत १३ टक्के तर दहावी १२ टक्केच मुस्लिम मुलं शिक्षण घेत आहेत. तरीही तुम्ही आरक्षण देत नाही. मुस्लिमांना शिकायचं आहे. पण त्यांच्याकडे पैसे नाही. त्यामुळे ते शिकू शकत नाही. तुम्ही आम्हाला आरक्षण द्या, आमची मुलं सुध्दा शैक्षणिक प्रगती करतील. शिक्षणात आपला टक्का प्रचंड कमी आहे. तरीही धर्मनिरपेक्षतेच्या गप्पा मारणार आहात? अशी विचारणा त्यांनी केली.
