पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) गेली अनेक वर्षे पुण्यातील काँग्रेस भवन शांत होते त्याला नवचैतन्य मिळाले आणि या प्रागणांत घुमला गावरान शिट्या आणि जोरदार टाळ्याचा आवाज त्याला कारणही तसच होत नुकताच डाव्या आघाडीतून काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला युवा नेता कन्हैयाकुमार यांनी लोकशाही बचाव सभेत काँग्रेस भवनासमोर केलेले भाषण
        पुण्याततील काँग्रेस भवानाचे प्रागंण गर्दीत भरुन गेले होते यात तरुणांची संख्या लक्षणीय होती हिंदी भाषेवर असणारी मजबूत पकड तसेच राजकीय तसेच ऐहतसिक संदर्भ देत चालूघाडामोडीवर खास आपल्या शैलीत केलेली भाषण आणि अधूनमधून केंद्र सरकारला काढलेले चिमटे यामुळे उपस्थित गर्दीमधून टाळ्या आणि शिट्यांचा आवा घुमत होता कन्हैयाकुमारमुळे सभेला आलेल्या काँग्रेस नेत्यासह तरुणामध्ये नवचैतन्याचे वातावरण पसरले होते जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील डाव्या विचारसरणीचा विद्यार्थी नेता ते काँग्रेसचा युवा नेता असा राजकीय प्रवास असलेला कन्हैयाकुमार राजकीय पटलावर कोणता रंग भरणार हे आगामी काळात कळणार याचीच एक झलक  पुण्याततील काँग्रेस भवनातील सभेत पाहावयास मिळाली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *