थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) रब्बी हंगामात खरिपातील पिकांसाठी बियाणांची कमतरता भासू नये म्हणून महाबीजच्यावतीने तयारी केली जात आहे. मात्र, बिजोत्पादन कार्यक्रम राबविण्यासाठी शासनाकडून १०० टक्के अनुदान दिले जाते, पुुढील खरीप हंगामात सोयाबीन बियाणे पुरवठा करण्याचे उद्दीष्ट समोर ठेऊन हा कार्यक्रम राबविला जात आहे. यात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे अवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी पोकरा अंतर्गत पायाभूत व प्रमाणित बियाण्यांचे बिजोत्पादन करण्यासाठी दिले जाते.शासकीय, सहकारी, निमशासकीय संस्थांच्या किंवा शेतकरी उत्पादक कंपनीच्या बिजोत्पादन कार्यक्रमांतर्गत सहभागी शेतकरी तसेच थेट बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे नोंदणी करुन शेतकरी या बीजोत्पादन कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. यासाठी शेतकऱ्यांकडे सिंचन स्त्रोत आवश्यक आहे.पायाभूत बियाण्याची किंमत आणि प्रमाणित बियाणे उत्पादनासाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. यामध्ये प्रत्यक्ष खर्चाच्या १०० टक्के किंवा कमी कमी १५ हजार रुपये प्रती हेक्टर इतके अनुदान शेतकऱ्यांना मिळते. त्यासाठी एका खातेदाराने कमाल १० हेक्टर बिजोत्पादन क्षेत्रात बीजोत्पादन केले तर १ लाख ५० हजार रुपये अनुदान हे योजनेअंतर्गत मिळते.यासाठी शेतकऱ्यांनी  https://dbt.mahapocra.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज करावा. यासाठी ७/१२ उतारा, शेतकऱ्याचे हमीपत्र, बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे केलेली नोंदणी प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे. त्यानंतर ग्राम कृषी संजीवनी यासाठी मंजुरी देईल व उपविभागीय कृषी कार्यालयाच्या पुर्वसंमती नंतर बीजोत्पादन करता येणार आहे. पेरणी नंतर कृषी सहाय्यक हे बिजोत्पादन क्षेत्राची पाहणी करुन ते प्रमाणीत आहे का नाही हे ठरवतील.

बिजोत्पादक शेतकऱ्याला अनुदानाची मागणी ही संबंधित कृषी सहाय्यक यांच्याकडे करावी लागणार आहे. शिवाय आवश्यक कागदपत्रेही जोडावी लागणार आहेत. यामध्ये पायाभूत बियाणे खरेदी पावतीची मुळ प्रत. बीज प्रमाणीकरण यंत्रणे कडे शुल्क अदा केल्याच्या पावतीची मुळ प्रत, कृषी सहाय्यक यांचा क्षेत्र पाहणी अहवाल जोडावा लागेलं. यानंतर ही अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *