थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पुणे एअरपोर्ट अथॉरिटीला ट्विटरवरुन पुणे विमानतळावर लावलेल्या चित्राबद्दलही प्रश्न विचारले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज याचे जन्म स्थान त्यांनी केलेली सर्जिकल स्ट्राईक केलेला लाल महालसुद्धा पुण्यात आहे असे असताना महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज यांची छायाचित्रे इथे का नसावीत अशी आठवण त्यांनी करुन दिली आहे. पुणे विमानतळावर पेशवाईची चित्रे दिसतात मग शिवरायांचे कर्तृत्व का दिसत नाही असा सवाल खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे

पेशव्यांनी केलेल्या पराक्रमाचा आम्हाला आदर आहेच, परंतु पुण्यात केवळ शनिवारवाडा नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा लालमहालसुद्धा आहे, सिंहगड आणि याच जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरी तसेच छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदानस्थळ वढू, तुळापूर देखील येथेच आहे याचा पुणे एअरपोर्ट अथॉरिटीला विसर का पडावा

पुणे विमानतळावर काढण्यात आलेल्या चित्राबद्दलची समाज माध्यमावरची खासदार अमोल कोल्हें यांची पोस्ट चर्चेत आहे. पुणे विमानतळावर पेशवाईची चित्रे दिसतात पण मग शिवरायांचे कर्तृत्व का दिसत नाही असा सवाल त्यांनी ट्विटरवरुन पुणे एअरपोर्ट अथॉरिटी विचारला आहे. विमानतळावरील चित्रासोबत घेतलेला फोटो कोल्हेंनी ट्विटरवर शेअर केला आहे.ज्या पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा‌ जन्म झाला तो किल्ला, पुण्यात‌ त्यांनी शाहिस्तेखानाची बोटं छाटली तो लाल महाल, तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची साक्ष असणारा सिंहगड आणि छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदानस्थळ वढू तुळापूर देखील आहे, अशी आठवण अमोल कोल्हे यांनी करुन दिली आहे. शिवाजी महाराज, संभाजी‌ महाराज यांचा इतिहास सांगणारं विमानतळावर काहीच नाही, याबद्दल अमोल कोल्हे यांनी नाराजी व्यक्त केली. अमोल कोल्हे यांनी या ट्विटमध्ये केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदीया, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, पुण्याचे खासदार गिरीश बापट, पुणे एअरपोर्ट अथॉरिटीला टॅग केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *