थेऊर (हवेलीनामा आनलाईन) पूर्व हवेलीतील उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अनिता सुभाष बगाडे यांची बिनविरोध निवड करण्यात
आली आहे उपसरपंच संचिता संतोष कांचन यांनी
आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या
पदासाठी उरुळी कांचनचे सरपंच संतोष कांचन यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली यावेळी बगाडे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी कांचन यांनी त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली.
ग्रामविकास आधिकारी यशवंत डोळस यांनी
निवडणूकीचे कामकाज पाहिले यावेळी जिल्हा
परिषद सदस्या कीर्ती कांचन, जिल्हा नियोजन
समितीचे सदस्य संतोष आबासाहेब कांचन,माजी सरपंच दत्तात्रय कांचन,माजी उपसरपंच संचिता कांचन ग्रामपंचायतसदस्य अमित कांचन, राजेंद्र कांचन, भाऊसाहेब कांचन,शंकर बेडकर, प्रियांका कांचन, मयूर कांचन,सुनिल तांबे, मिलिंद जगताप, सिमा कांचन, स्वप्नीशा कांचन, सुजाता खलसे, अनिता तुपे, सामाजिक
कार्यकर्ते सुभाष बगाडे, सागर कांचन, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
