थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) पुणे शहराचे नागरिकीकरण झपाट्याने वाढत असल्याने शहरालगत असणाऱ्या गावात लोकांची राहण्यासाठी पसंती वाढली पर्यायाने येथील जमीनीना सोन्याचा भाव आला आहे ग्रामीण भागाचे शहरीकरण होण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे साहजिकच येथील गावांमधून वाहणारे पारंपरिक ओढे, नाले फक्त महसूली नकाशावरच दिसत आहे गावातून वाहणारे ओढे नाले धनदांडग्याकडून भरावा टाकून अतिक्रमण करुन गिळंकृत होण्याचा खेळ राजरोस पणे सुरु आहे पंरतु याकडे लक्ष देण्यास किंवा ओढ्यावरील अतिक्रमण हटविण्यास माञ महसूल विभागाकडून जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे की काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे अनेक ठिकाणी ओढ्या नाल्यांची प्रवाह बदलण्यात आले आहेत त्यामुळे पावसाळ्यात ओढयाला येणाऱ्या पाण्याचा प्रवाह नागरी भागात घुसून पुरपरिस्थिती निर्माण होऊन नुकसान करण्यास कारणीभुत होत आहे तर शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरुन शेतात असलेल्या पिकासह माती वाहून जात आहे हा प्रकार गेली अनेक दिवसापासून चालू आहे परंतु या अतिक्रमणावर कायम स्वरुपी तोडगा कधी निघणार याच उत्तर माञ महसुल विभाग देण्यास अमर्थ आहे अशी स्थिती आहे यात अनेक धनदांड्यानी पारंपरिक ओढ्यानाल्यावर आतिक्रमण केले आहे
मागच्या वर्षी थेऊर, कुंजीरवाडी, लोणी काळभोर शिवेवरून वाहणारा ओढा गायप झाल्यावर तेथे शेतात पुराचे पाणी शिरले होते त्यावर हवेलीचे तत्कालीन तहसीलदार कोळी यांनी पंचनामे करून ओढे मोकळे करण्याचे आदेश दिले होते परंतु आजपर्यंत यावर कोणतीच हालचाल झाली नाही तरीही आणखी या परिसरात ओढे साफ करण्याचा उद्योग चालू आहे यावर महसूल अधिकाऱ्यांनी दंडात्मक कारवाई करून ओढे मोकळे करावेत अशी स्थानिक मागणी करत आहेत
