थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन)

     नोंदीसाठी तलाठी कार्यालयात खेटा घालण्याचे दिवस संपले आता खरेदीखत होताच त्याच दिवशी होणार फेरफार नोंद यामुळे कोणत्याही प्रलंबित नोंदी शिल्लक राहणार नाहीत अशी सेवा मिळणार असल्याने शेतकरी वर्गात याचे नक्कीच स्वागत होणार आहे

          महसुली विभागाचे आजपर्यंतचे सर्वांचे अनुभव खूपच भयंकर आहेत जमिनीचे खरेदीखत केल्यानंतर त्या दस्ताची फेरफार नोंद करताना शेतकरी वर्गास अनेक अडचणी निर्माण होत असत वेळेवर नोंद होणे हे अवघड असायचे यात सुसुत्रता आणण्यासाठी शासकीय पातळीवर यात काही बदल करता येतील का यावर अनेक दिवस विचार चालू होते याला मूर्त स्वरूप देऊन नुकतीच याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे.

          एखाद्या व्यक्तीने जमीन खरेदी केल्यानंतर त्याची ऑनलाइन नक्कल निबंधक कार्यालयाकडून महसूल विभागातील संबंधित गावकामगार तलाठ्याकडे दाखल होईल त्यावरून संबंधित तलाठी त्याची फेरफार नोंदणी करेल यावर कोणाची हरकत असल्यास त्यासाठी कालावधी असेल त्यादरम्यान ती नोंदवून आपले म्हणणे मांडायचे आहे.

          यामुळे सर्वसामान्य माणसाला मोठा दिलासा मिळणार असल्याने याचे सर्वच स्थरातून स्वागत करण्यात येत आहे याचा सरळ कामाच्या पारदर्शक पध्दतीत वाढ होणार असून सुसूत्रता येणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *