पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तथा डॉ श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचे रुग्ण सेवक मंगेश चिवटे यांनी आपले अविस्मरणिय अनुभव कथन केले
तर आज आदरणीय दादांचा सन्मान होता, पण त्यांनी तो न स्विकारता माझ्यासारख्या कार्यकर्त्याला व्यासपीठावर बोलावून सन्मानित केले याहून अधिक मोठे भाग्य कोणते…?? एवढ्या विशाल हृदयाचा नेता असू शकतो, आपल्या लहानशा कार्यकर्त्यांवर देखील आपला नेता एवढा जीव लावू शकतो हे पाहुन त्या पंचतारांकित हॉटेल मधील सर्व जण अचंबित झाले होते…कदाचित तिथं उपस्थित असलेल्या सर्वांनीच असा प्रसंग आयुष्यात प्रथमच अनुभवला असणार ही खात्री आहे…कारण सध्याच्या निष्ठा हरवत चाललेल्या, सात्विकपणा गमावलेल्या, गिव अँड टेक रिलेशनशप झालेल्या आणि पैसा – प्रसिद्धीसाठी बटबटीत – उथळ झालेल्या राजकारणात नेत्याने आपला सन्मान स्वतः न स्विकारता आपल्या कार्यकर्त्यांचा सन्मान करावा हा प्रसंग दुर्मिलातील दुर्मिळ ठरला आहे.
आज झी २४ तास या प्रतितयश वृत्तवाहिनाचा *उडान डेयर टू ड्रीम सन्मान* हा खासदार डॉ श्रीकांत ( दादा ) शिंदे साहेब यांस मिळणार होता…. या कार्यक्रमाला तुला आवर्जून यायचे आहे अशी सूचना वजा आदेशच २ दिवसांपूर्वी आदरणीय दादांनी दिला मला होता….यानुसार शिवसेना वैद्यकीय मदत कक्षचे सहकारी श्री राम राऊत आणि श्री जितेंद्र सातव आणि डॉ श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचे सचिव श्री अभिजितजी दरेकर यांच्यासमवेत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जवळील पंचतारांकित हॉटेल लीला मध्ये वेळेआधीच दाखल झालो…याठिकाणीच इलेक्ट्रॉनिक मिडियात मला प्रथम संधी देणारे आणि सध्या zee २४ तास वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक सर्वश्री श्री निलेशजी खरे सर यांची भेट झाली….सरांचे शुभेच्छा – आशीर्वाद घेईपर्यंत जुने मित्रवर्य आणि सोलापूर जिल्हा भूमिपुत्र श्री सागरजी कुलकर्णी यांची भेट झाली…. सोबतच वरिष्ठ पत्रकार श्री दीपक जी भातुसे सर , श्री निनाद झरे या जुन्या सहकाऱ्यांची भेट झाली…आमच्या गप्पांत अर्थातच जुन्या काळातील आठवणींना उजाळा मिळाला….अष्टपैलू स्व.स्वानंद कुलकर्णी , गूगल म्ह्णून ज्यांचा उल्लेख करायचो ते स्व.मंदार पुरकर सर यांच्या आठवणीने आम्ही सर्वच भावुक झालो…
नंतर, गप्पांत डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांचा विषय निघाला…मित्रवर्य सागर कुलकर्णी यांनी फाऊंडेशनचा चौथा वर्धापनदिन कार्यक्रम खूप छान झाला सांगून शुभेच्छा दिल्या. तर श्री दिपक भातुसे सर यांनी लोकांसाठी दिवसरात्र काम करणारे मा ना श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि डॉ श्रीकांत दादा शिंदे हे खऱ्या अर्थाने लोकनेते आहेत, कोविड संकट काळात पिता पुत्रांनी केलेल्या कामाला तोड नाही अशी भावना व्यक्त केली.
अर्थातच यावेळी कोविडच्या पहिल्या लाटेत विशेषतः पत्रकार बांधवांसाठी मोफत केलेल्या RTPCR टेस्ट शिबिर, कोविडग्रस्त पत्रकार बांधवाना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणे असो की दुसऱ्या लाटेत बेड मिळवून देणे असो किंवा रेमडीसीवर इंजेक्शन उपलब्ध करून देणे असो…आदरणीय मा ना श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि डॉ श्रीकांत दादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून झालेला मदत कार्याचा विषय निघाला….
डॉ श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा कार्याविस्तार फक्त आणि फक्त दोन्ही शिंदे साहेब पिता पुत्रांमुळे कसा होत आहे याची माहिती मी दिली…कोविड संकटकाळात राज्यातील सर्व जिल्ह्यात मागणी तेथे पुरवठा या तत्वानुसार स्वखर्चाने १०० अद्ययावत सुसज्ज रुग्णवाहिका विवीध मतदारसंघात मोफत वितरित करणारे हे पिता – पुत्र आधुनिक दानशूर कर्ण आहेत असल्याची माझी प्रामाणिक भावना मी बोलून दाखवली…
पहिल्या सत्रात झालेल्या परिसंवादात मा.खा.डॉ. श्रीकांत दादा शिंदे यांनी आपली भूमिका विशद केली. कोविड संकट काळात फाऊंडेशनच्या माध्यमातून झालेलं काम, कोविड संकटानंतर राज्य आणि राष्ट्र उभारणीमध्ये नव उद्योजक , सामाजिक संस्था यांचा सहभाग याविषयी विचार मांडले…विशेषतः बांधकाम क्षेत्राच्या आणि पायाभूत सुविधांचा माध्यमातून राष्ट्रबांधणी करिता योगदान याविषयी आपले मनोगत व्यक्त केले… नागपूर – समृद्धी महामार्ग हा आधुनिक महाराष्ट्राच्या जडण घडणीत गेम चेंजर ठरेल , या महामार्गमुळे राज्याच्या राजधानीशी आणि पर्यायाने देशाच्या आर्थिक राजधानीशी विदर्भ आणि मराठवाडा जोडला जाणार असल्याने , या भागात खऱ्या अर्थाने आर्थिक समृद्धी आणि सुबत्ता येईल असा आशावाद व्यक्त केला…..
पहिल्या परिसंवादाच्या सत्र नंतर डॉ.श्रीकांत दादा शिंदे यांनी व्ही आय पी कक्षात डोंबिवली शहर प्रमुख श्री राजेश मोरे, उपजिल्हा प्रमुख श्री राजेश कदम, संघटक श्री संतोष चव्हाण यांच्या समवेत चहा घेतला.दरम्यान कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे केंद्रीय अर्थ राज्य मंत्री मा ना श्री भागवत कराड साहेब आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा ना श्री अशोकराव चव्हाण साहेब यांचे व्ही आय पी कक्षात आगमन झाले….तिथे मा.खा.डॉ.श्रीकांत दादा शिंदे यांनी माझा या नेतेद्वयीना आवर्जून परिचय करून दिला…थोड्याच वेळात मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली….यात समाजात विविध विषयांत जसे की उद्योग, समाजसेवा, बांधकाम क्षेत्र, पर्यटन, शिक्षण आदी क्षेत्रात उत्तुंग काम केलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येत होता…केंद्रीय अर्थ राज्य मंत्री मा ना श्री भागवत कराड साहेब, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा ना श्री अशोक चव्हाण साहेब, आणि स्वतः मा खा डॉ श्रीकांत दादा शिंदे साहेब यांच्या हस्ते पहिल्या टप्प्यात सत्कारमूर्तींचा सन्मान करण्यात आला. यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री मा ना श्री अशोक चव्हाण साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
पुरस्कार सन्मान सोहळ्यातील दुसऱ्या टप्प्यात सूत्र संचालक यांनी डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनचा शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील कामासाठी पुरस्कार जाहीर केला. यावेळी व्यासपीठावर असलेल्या आदरणीय खा डॉ श्रीकांत दादा शिंदे यांनी सूत्रसंचालक यांचेकडून माईक मागवून घेतला आणि मला व्यासपीठावर येण्याचे सूचना वजा आदेशच दिले…मी व्यासपीठावर पोहोचताच , आदरणीय दादांनी डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा सांगितला.. ठाण्याच्या एका छोट्याशा कार्यालयातुन झालेली सुरुवात आणि आज २२ जिल्ह्यात १५०० पेक्षा अधिक स्वयंसेवकांच्या माध्यमातून लोकांची होत असलेल्या रूग्ण सेवे विषयी भाष्य केले…त्यामुळे आज माझा सन्मान करण्याऐवजी , खऱ्या अर्थाने जमिनीवर काम करणाऱ्या मंगेशचा सत्कार करण्याची विनंती आदरणीय दादांनी दोन्ही मंत्री महोदय यांना केली…मला भरून आलं होतं, कृतकृत्य झाल्याची भावना मनात होती….
खरं तर आज आदरणीय दादांचा सन्मान होता, पण त्यांनी तो न स्विकारता माझ्यासारख्या कार्यकर्त्याला व्यासपीठावर बोलावून सन्मानित केले याहून अधिक मोठे भाग्य कोणते…?? एवढ्या विशाल हृदयाचा नेता असू शकतो, आपल्या लहानशा कार्यकर्त्यांवर देखील आपला नेता एवढा जीव लावू शकतो हे पाहुन त्या पंचतारांकित हॉटेल मधील सर्व जण अचंबित झाले होते…कदाचित तिथं उपस्थित असलेल्या सर्वांनीच असा प्रसंग आयुष्यात प्रथमच अनुभवला असणार ही खात्री आहे…कारण सध्याच्या निष्ठा हरवत चाललेल्या, सात्विकपणा गमावलेल्या, गिव अँड टेक रिलेशनशप झालेल्या आणि पैसा – प्रसिद्धीसाठी बटबटीत – उथळ झालेल्या राजकारणात नेत्याने आपला सन्मान स्वतः न स्विकारता आपल्या कार्यकर्त्यांचा सन्मान करावा हा प्रसंग दुर्मिलातील दुर्मिळ ठरला आहे…
संवेदनशील व्यक्तीमत्व असणाऱ्या आदरणीय मा ना श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि तितकेच संवेदनशील व्यक्तीमत्व असणाऱ्या मा खा डॉ श्रीकांत दादा शिंदे साहेब यांच्याविषयी याच भावना माझ्या मनात आहेत….
(साभार : – जगदीश काशीकर)

