बारामती (हवेलीनामा ऑनलाइन) बारामती तालुका मुख्याध्यापक संघाच्या वतीने कोरोना कालावधीत ज्या विद्यार्थ्यांचे आई किंवा वडील मयत झाले आहेत अशा ९ विद्यार्थ्यांना प्रत्येकी २,००० रुपये प्रमाणे १८,००० रुपये मदत निधीचे वाटप करण्यात आले.     यामध्ये शारदाबाई पवार विद्यानिकेतन शारदा नगर, न्यू इंग्लिश स्कूल वाकी, श्री छत्रपती हायस्कूल सोनगाव, श्री छत्रपती हायस्कूल काटेवाडी ,सोमेश्वर विद्यालय सोमेश्वर नगर, कै. जिजाबाई दादासाहेब गावडे विद्यालय पारवडी या विद्यालयातील विद्यार्थ्यांना निधी देण्यात आला याप्रसंगी निंबोडी हायस्कूलचे मुख्याध्यापक ठेंगल एन डी , उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक सिकंदर शेख, वाकी हायस्कूलचे मुख्याध्यापक इनामदार सर , काटेवाडी हायस्कूलचे लिपिक अनिल ठोंबरे, सोनगाव हायस्कूल चे सेवक पोपट कुलाळ , शारदानगरचे सेवक रविंद्र कांबळे उपस्थित होते.त्यांना ही रक्कम धनादेशाद्वारे देण्यात आली असून विद्यार्थ्यांनी ते आपल्याच बँक खात्यात भरावेत या मदतीतील रक्कम शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठीच वापरावी असे आवाहन करण्यात आले. शब्बीर इनामदार यांनी सर्वाचे आभार मानले.  आतापर्यंत मुख्याध्यापक संघाकडून एकूण २,११,००० ( दोन लाख आकरा हजार) रूपये निराधार विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *