थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) कोरोनामुळे गेली १८ महिने शाळा बंद असल्याने लहान मुलांच्या शैक्षणिक जीवनावर मोठा विपरीत परिणाम झाला असून त्यांना बालगीतातील भोलानाथ पाऊस पडेल का ऐवजी भोलानाथ शाळा उघडेल का असे ही मुलं बोलताना दिसत आहेत
सुरुवातीला शाळेत जायला प्रत्येक लहाणग्याना आवडत नाही ती आपल्याला शिक्षा आहे असं वाटतं परंतु बालकांच्या सर्वांगिण विकासाचे धडे शाळेतून मिळतात वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून आता शालेय शिक्षणाला सुरुवात होते लहान मुलांना सुरुवातीला गाण्यातून धडे दिले जातात गाण्याच्या तालावर ही बच्चेकंपनी आनंदाने नाचत शिकतात परंतु गेल्या दीड वर्षांपासून शाळा पूर्णपणे बंद करण्यात आल्याने बच्चेकंपनीवर वेगळेच दडपण दिसून येत आहे या कालावधीत बुडालेले शिक्षण कसे भरून काढायचे हा प्रश्न पालकांना सतावतोय.
याविषयी काही तज्ञ शिक्षकांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांना मोबाईलचे आकर्षक वाढले अनेक मुलांना डोळ्याचे आजार जडले आहेत या मुलांना यापासून बाहेर काढणे भविष्यात मोठे आव्हान असणार आहे. सध्या माध्यमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला असला तरीही प्राथमिक शाळा कधी चालू होतील याची शास्वती नाही टास्क फोर्स ने याला परवानगी देण्यास नकार दिला आहे जोपर्यंत मुलांचे लसीकरण होत नाही तोपर्यंत शाळा उघडणार नाहीत असे चित्र दिसत आहे तयामुळे ही बच्चे मंडळी म्हणतेय,
“सांग सांग भोलानाथ शाळा उघडेल का?”
