थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन)
पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या हवेली तालुका सरचिटणीस पदी शितल शेडगे यांची निवड करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा अध्यक्ष भारती शेवाळे, हवेलीचे आमदार अशोक पवार व हवेली तालुका अध्यक्ष सुरेखा भोरडे यांच्या हस्ते निवडचे पत्र देण्यात आले. यावेळी शितल शेडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष न्याय देणारा पक्ष असून पुणे जिल्हा अध्यक्ष भारती शेवाळे, तालुका अध्यक्ष सुरेखा भोरडे, यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे काम एकनिष्ठ व प्रामाणिक पणाने येणाऱ्या काळात करण्यात येईल. पुणे जिल्हात महिलांचे सक्षमीकरण करून पक्षाचे संघटन करण्यात येईल. पक्षाच्या माध्यमातून गोर गरीब जनतेची कामे करण्यावर भर देण्यात येईल. असे सांगितले
यावेळी पं. समिती सदस्य वसुंधरा उबाळे, महिला पुणे जिल्हा अध्यक्ष भारती शेवाळे, जिल्हा उपाध्यक्ष शोभा हरगुडे, सुरेखा खोपडे, स्मिता नोटरन, पुणे जिल्हा सरचिटणीस अर्चना सरोदे, हवेली तालुका सुरेखा भोरडे, हवेली उपाध्यक्ष सिता जाधव, संध्या भोर, वर्षा थोरात, हवेली सरचिटणीस रोहिणी पवार, मंगेश सातव, व इतर महिला कार्यकर्त्यां हजर होत्या
