थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन)   निसर्गातील होणाऱ्या प्रदूषणात मानवनिर्मित घटकांचा अधिक वाटा असून प्लास्टिकचा कचरा ही जगातील सर्वात मोठी समस्या निर्माण झाली आहे त्यामुळे जागतिक पातळीवर यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायद्यात तरतूद करून नियमन केले जात आहे आपल्या देशात गेल्या काही वर्षात प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी ही गंभीर समस्या उभी राहिली आहे.

         पूर्व हवेलीतील बहुतेक सर्वच गावात प्लास्टिकचा महापूर होतोय यावर नियमन ठेवण्याची सर्वस्वी जबाबदारी ही ग्रामपंचायत वर आहे परंतु गेल्या कित्येक महिन्यात यांच्याकडून आजपर्यंत एकही कारवाई झाली नाही त्यामुळे बाजारपेठेत भाजी फळ विक्रेते सर्रासपणे प्लास्टिकचा वापर करत आहेत यावर त्यांना विचारले असता उलट पक्षी आम्ही व्यवसाय कसा करायचा असे प्रतिप्रश्न करतात शासनाने जर प्लास्टिक निर्मिती थांबवली तर आम्ही कशाला प्लास्टिक वालरू असे ते बोलतात.
          ही समस्या दूर करायची असे तर ग्रामपंचायत पातळीवर कठोर अंमलबजावणी करत दंडात्मक कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
       हवेलीतील पूर्व भागात असलेल्या बहुतेक सर्व ग्रामपंचायत क्षेत्रात कचरा व्यवस्थापन करण्यासाठी कचरागाडी फिरते तो कचरा साठवण्यासाठी तशी कायमस्वरूपी यंत्रणा उभी करून तो पुनर्वापराची व्यवस्था होणे आवश्यक आहे गोळा होणाऱ्या कचऱ्यात प्लास्टिक पिशव्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून बाजारपेठेत होत असलेला सुमार प्लास्टिकचा वापर यासाठी जबाबदार आहे म्हणून ग्रामपंचायत पातळीवर यास प्रतिबंध घालणे आवश्यक आहे.
           या भागात लोणी काळभोर, थेऊर, कुंजीरवाडी व उरुळी कांचन येथे आठवडे बाजार भारतात तर दररोज भाजी फळ विक्री चालूच असते प्रत्येक गाडी विक्रेते यांचेकडे प्लास्टिक पिशव्यांचा सर्रासपणे वापर चालू आहे. सुरुवातीला प्लास्टिक बंदी घालण्यात आली तेंव्हा काही ठिकाणी दंडात्मक कारवाई केली पण पुन्हा त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष झाले आहे आणि हा ग्राम स्वच्छता अभियानाचा एक भाग असूनही ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक कारवाई करण्याची तयारी दाखवत नाहीत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *