शिरूर (हवेलीनामा ऑनलाइन)
हुडको वासियांना त्यांची घरे नावावर करुन देण्याबाबत सभागृह नेते प्रकाश धारिवाल यांनी नागरिकांना दिलेला शब्द पुर्ण करुन प्रत्येक लाभधारकाच्या नावावर घरे होणार असल्याने हुडकोतील ३७१ घरांचा अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला असल्याची माहिती नगराध्यक्षा वैशाली वाखारे यांनी सांगितली.
शिरूर नगरपरिषदेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत नगराध्यक्षा वाखारे यांनी माहिती सांगतली.यावेळी स्वच्छता व आरोग्य समितीचे सभापती विठ्ठल पवार, पाणी पुरवठा समितीचे सभापती मुजफ्फर कुरेशी, नगरसेवक संदिप गायकवाड, नगरसेविका रोहिणी बनकर, सुरेखा शितोळे, उज्वला वारे,उज्वला बरमेचा उपस्थित होत्या.
याबाबत माहिती देताना नगरसेवक विजय दुगड म्हणाले,नगरपरिषदेने १९८७ रोजी गृहनिर्माण योजना करण्याचे ठरवले तर यावेळी स्व.शहिदखान पठाण,स्व.रसिकलाल धारिवाल व त्यांचे सहकारी यांनी केले.या योजनेसाठी हुडकोने राज्य शासनाच्या हमीवर ९२ लाख ७८ हजार रुपये कर्ज दिले.जोपर्यंत हे कर्ज पुर्ण फिटत नाही तोपर्यंत घरे नावावर करण्यास परवानगी मिळणार नव्हती.२००४ रोजी कर्ज पुर्ण फिटल्यानंतर नगरपरिषदेने ठराव करून घरे नावावर करण्याबाबत जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव पाठविला याबाबत पाठपुरावा करत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, आमदार अशोक पवार,माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांसह आजी माजी मंत्री व सर्व नगरसेवक,नगरसेविकांचे सहकार्य मिळाले.
हुडकोची घरे हस्तांतरण करून लाभधारकांच्या नावावर करण्याबाबत काही तांत्रिक अडचणी पुर्ण करुन १९८७ ला सुरू झालेल्या व १९९० ला लाभधारकांना ताबा दिलेल्या या गृहनिर्माण योजनेच्या जागेचे ५६ लाख ८२ हजार रुपये मुल्यांकन भरण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी १० जुलै २०१४ रोजी सांगितले त्यानुसार ३० जुलै २०१४ ला शासनाला भरल्यानंतर खऱ्याअर्थाने प्रश्न मार्गी लागण्यास सुरुवात झाली, मार्च २०१९ रोजी शासनाने घरे नावावर करण्याबाबतचा आदेश दिला.
परंतु हि मिळकत ३७ हजार २९३ चौ.मी.एकत्रित असल्याने वैयक्तिक हस्तांतरण करण्यासाठी प्लॉट
करणे गरजे असल्याने शेपरेट प्लॉटींग करून ५७.०८ चौ.मी.प्रमाणे प्रत्येक लाभधारकाचे प्रॉपर्टी कार्ड होणार असुन सोमवार दि.१५ रोजी सहा लाभधारकांचे हस्तांतरण पत्र झाले आहे.टप्याटप्याने नियमात बसणाऱ्यांचे हस्तांतरण पत्र होऊन त्याप्रमाणे प्रॉपर्टी कार्ड तयार होणार असल्याचे नगरसेवक विजय दुगड यांनी सांगितले.
“हुडको वासियांचा घरे नावावर करण्याचा प्रलंबीत प्रश्र्न नगरसेवक विजय दुगड यांच्यासह सर्वांच्या सहकाऱ्याने तसेच प्रामाणिक प्रयत्नाने मार्गी लागला असुन हुडकोच्या ३७१ नागरिकांचे घरे हस्तांतरण पत्राद्वारे नावावर होऊन प्रॉपर्टी कार्ड तयार होणार असल्याने आनंद होत आहे”.सभागृह नेते प्रकाश धारिवाल यांनी सांगितले.
