थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) ग्रामीण भागातील खेळाडूंना वाव मिळाला पाहिजे यासाठी गावपातळीवर वेगवेगळ्या खेळाच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात पूर्व हवेलीतील नायगाव येथे दिवाळीच्या मुहूर्तावर नायगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून दहा शटकाचे क्रिकेट सामने आयोजित केले होते त्यात गावातीलच आठ संघातील खेळाडूंची निवड बोली लावून करण्यात आली ही ग्रामीण भागातील अशा प्रकारची पहिलीच लीग स्पर्धा परंतु नायगाव मध्ये गेल्या वर्षीपासून आयोजित केली जाते.
नायगाव येथे अशा प्रकारच्या क्रिकेट सामन्याचे दुसरे वर्ष आहे हे सामने पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत, नायगाव ग्रामीण बिगरशेती पतसंस्था यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य लाभले तसेच गावातील बऱ्याच नागरिकांनी क्रिकेट मैदान तयार करण्यासाठी वेगवेगळे सहकार्य केले.
दररोज सकाळी दहा शटकाचे दोन सामने खेळवले गेले यात पहिले पारितोषिक रायगड वारीयर्स यांनी दुसरे नितीन आप्पा शूटरस्.,तिसरे दोस्ती चॅलेंजर्स तर चौथे जी एस फायटर यांनी पटकावले. उर्वरित संघांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले तसेच या स्पर्धेत मालिकावीर सागर घोडके सर्वोत्तम गोलंदाज गोपाळ गायकवाड तर फलंदाज अभिषेक चौधरी विजयी संघांना माजी सरपंच नायगाव राजेंद्र चौधरी यांंच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले यावेळी सरपंच गणेश गुलाब चौधरी,पेठ गावचे सरपंच सूरज चौधरी ग्रामपंचायत सदस्य उत्तम शेलार, मराठा महासंघ पुणे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश चौधरी,नायगाव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सुनील हगवणे,व्हाईस चेअरमन संजय कामठे,संचालक राहुल गजानन चौधरी,सोपान चौधरी,जालिंदर शिर्के,किरण गुळूंजकर,सोमनाथ खेडेकर,नंदकुमार चौधरी,व्यवस्थपक नंदकुमार चौधरी,कैलास चौधरी,रामचंद्र पवार नवनाथ गायकवाड, तंटामुक्ती समिती अध्यक्ष संजय चौधरी,पंडित जयसिंग चौधरी,संजय दत्तात्रय चौधरी,दत्तात्रय गुळूंजकर,दत्तात्रय बलकवडे,रघुनंदन शेलार,निलेश जाधव,अजित पाटोळे,निलेश आत्माराम चौधरी,शिवाजी बबन चौधरी,दत्तात्रय अंकुश चौधरी,राहुल युवराज चौधरी,राजेंद्र शेलार,सागर शेलार,दत्तात्रय खेडेकर उपस्थित होते
संघमालक पुढील प्रमाणे होते नितीन सुभाष हगवणे यांचा नितिन आप्पा शुट्रर्स,अमोल शंकर चौधरी यांचा श्रीनाथ एम्पायर्स,रविंद्र अवचट यांचा दोस्ती चलेंज,गणेश गुलाब चौधरी,संतोष विठ्ठल हगवणे यांचा जी एस फायटर,राहुल तुकाराम चौधरी,नंदकुमार दत्ताञय चौधरी यांचा आर एन वाॕरियर्स,अजय चौधरी,बाबू केसकर यांचा ए बी फायटर्स,कृष्णा चौधरी,संतोष चौधरी,संजय चौधरी यांचा एस एस के जेन्टस,अतुल चौधरी,निलेश चौधरी,अमोल खेडेकर यांचा रायगड वाॕरियर्स.
या सामन्याचे आयोजन दत्तात्रय गणपत बारवकर,गोरक्ष अर्जुन चौधरी,जितेंद्र शंकर चौधरी,पंकज जालिंदर चौधरी,आशिष सुभाष घेगडे,नरेश विलास चौधरी,अजिंक्य चौधरी हे होते
