थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र अवैध फलकाच्या विळख्यात या मथळ्याखाली हवेलीनामा या लोकप्रिय न्यूज पोर्टलमध्ये बातमी प्रसिद्ध होताच ग्रामपंचायत प्रशासन खडबडून जागे झाले तर स्थानिक पदाधिकाऱ्यानी याची दखल घेऊन ग्रामपंचायत कार्यालयास यावर कारवाई करण्यासाठी सांगितले त्यावर प्रशासनाने सर्व फलक हटवून परिसर स्वच्छ केला.
ग्रामपंचायतच्या वतीने येथे फलक लावणाऱ्यावर विद्रुपीकरण कलमांतर्गत कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा दिला याप्रसंगी कुंजीरवाडीचे पोलीस पाटील मिलिंद कुंजीर, तंटामुक्ती चे अध्यक्ष सचिन कुंजीर, उपाध्यक्ष सागर झेंडे, माजी उपसरपंच भरत निगडे, काळुराम कुंजीर, भाजपचे आदेश जाधव, शिवसेना शाखाप्रमुख विशाल वाईकर, दिलीप सावंत,विजय पुजारी, सतिश झेंडे,रोहित झेंडे, योगेश झेंडे,ग्रामपंचायत कर्मचारी आणि आरोग्य केंद्राचे मुख्य अधिकारी डॉ मेहबूब लुकडे हे उपस्थित होते
