पुणे (हवेलीनामा ऑनलाइन)  पुणे सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सध्या अवैध फलकामुळे झाकून गेले असून यावर ग्रामपंचायत अथवा महसूल विभाग काहीच कारवाई करत नसल्याचे दिसते.

       कुंजीरवाडी हे पुणे शहराच्या जवळ उपनगर म्हणून विकसित होत असून रहिवासी घराबरोबर व्यावसायिक इमारती वाढल्या आहेत अनेक प्रकारचे व्यावसायिकांनी आपल्या दुकानाची तसेच उत्पादनाची जाहिरात केली जाते यासाठी मोठे फलक तयार करून दर्शनी भागात लावले जातात
       असेच काही मोठे फलक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दर्शनी बाजूस तसेच डाव्या बाजूच्या भिंतीवर उभे केले असल्याने येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे हे समजून येत नाही यावर काय कारवाई होते यासाठी वाट पहावी लागणार आहे.
         यावर कुंजीरवाडी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक प्रकाश गळवे  यांनी सांगितले की, यावर संबंधित दुकांदारास रीतसर नोटीस बजावली जाईल व फलक हटवले जातील.परंतु यावर दंडात्मक कारवाई करू शकत नसल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *