जगदीश काशिकर,
        इचलकरंजी (हवेलीनामा ऑनलाइन) जवाहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सहकार महर्षि कल्लाप्पा आवाडे, तज्ञ संचालक आमदार प्रकाश आवाडे व केन कमिटी अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या नेतृत्वाखालील हुपरी येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्यास नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप. शुगर फॅक्टरीज् नवी दिल्ली या शिखर संस्थेने सन २०१९-२० वर्षात ७० हजार ७२८ मे. टन साखरेची विक्रमी निर्यात केल्याबद्दल जी देशातील सर्व साखर कारखान्यामध्ये ‘”सर्वाधिक साखर निर्यात” करणारा कारखाना ठरला  त्याचबरोबर सन २०२०-२१ मध्ये सर्वाधिक ऊस गाळप केल्याबद्दल “‘सर्वोच्च ऊस गाळप'” असे दोन पुरस्कार जाहीर झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *