पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) पुणे अहमदनगर महामार्ग हा मराठवाडा व विदर्भास जोडणारा एकमेव मार्ग असल्याने या मार्गावर प्रचंड ताण येतो विशेषतः सायंकाळी पाच नंतर रात्री अकरा वाजेपर्यंत ही गर्दी वाढत जाते अशा वेळी वाघोलीत या महामार्गावर अस्थाव्यस्त लावलेल्या वाहनांमुळे बाहेर गावी जाणाऱ्या प्रवाशांना खोळंबून बसावे लागते यावर तोडगा काढण्यासाठी वाहतूक विभागाने काही उपाययोजना योजना केल्या होत्या त्यास स्थानिकांनी आडकाठी घातल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

        पुणे अहमदनगर महामार्गाचे रुंदीकरण झाल्यावर अनेकांना असे वाटले की वाहतूक समस्या दूर होईल पण झाले उलटेच कारण येथे तीन ते चार ठिकाणी रस्ता ओलांडण्यासाठी सोय आहे त्यामुळे त्याठिकाणी कायम वाहतूक कोंडी होते यात आव्हाळवाडी चौक,केसानंद चौक आणि वाघेश्वर चौक येथे कायमस्वरूपी वाहतूक कोंडी होते यावर शहर वाहतूक विभागाने वाघोली गावातून आव्हाळवाडी गावाकडे जाणारा रस्ता बंद करून केसानंद चौकातून वाहने जावीत अशी व्यवस्था केली परंतु स्थानिक पातळीवर त्यास विरोध झाल्याने तो निर्णय मागे घ्यावा लागला परंतु यामुळे लांब पल्यावर जाणाऱ्या प्रवाशांना खोळंबून राहावे लागेल याचा कोण विचार करणार आहे की नाही
          वाघोलीत रस्त्याच्या कडेला कायम वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला जातो रस्ता अरुंद त्यात या वाहनाचा अडथळा त्यामुळे एकेरी वाहतूक होते परिणामी वाहनांच्या रांगा लागतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *