1. पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) वाहन कंपनी त भाड्याने लावतो असे अमिष दाखवून तब्बल २८ वाहने पळवून ती परराज्यात विकणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट ६ ला यश आले असून याप्रकरणी तिघे जण अटकेत आहेत त्यांच्याकडून १ कोटी २२ लाखाची १३ वाहने जप्त करण्यात आली आहेत
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,स्वतःची स्विफ्ट डिझायर गाडी असलेल्या व्यक्तीने ओला कंपनीत गाडी चालवत असताना एका गिलानी नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली त्याने तुझी चारचाकी मी नोकरीस असलेल्या नोएडा नवी दिल्ली येथील युनायटेड एस एफ सी सर्व्हिस कंपनीत लावतो असे सांगितले व गेल्या साडेचार महिन्यात अशा २८ चारचाकी वाहन चालकांची वाहने पळवून नेली या बद्दलची तक्रार लोणी काळभोर पोलिसात दाखल करण्यात आली होती.
    यावर तपासकामी गस्तीवर असलेल्या गुन्हे शाखेच्या युनिट ६मधील पोलीस नाईक कारखेले व मुंढे यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की यातील एक इनोव्हा गाडी दौड परिसरात विक्री करिता येणार आहे याबाबत पोलीस निरीक्षक गणेश माने यांना याची कल्पना दिली त्यांनी यावर आरोपींना सापळा रचून पकडण्यासाठी सूचना दिल्या. सापळा रचून तेथे १)मालिकबाबा उर्फ मुजाहिद राफीउद्दीन सय्यद गिलानी,२)ओंकार ज्ञानदेव वाटणे ३) मोहम्मद मुजीब मोहम्मद बशिरुद्दीन यांना ताब्यात घेतले त्यांना अटक करून न्यायालयाने २० ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली यात त्यांच्याकडून महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील विजय नगर ता बिलोली जी नांदेड व बालकोंडा जि निजामबाद येथून १कोटी २२ लाख रुपयांची, ४ इनोव्हा क्रिस्टा, १ इर्टीगा, २स्विफ्ट डिझायर, ४आयशर, २ अशोक लिलेंड अशी १३ वाहने जप्त करण्यात आली आहेत.आणखी पुढील तपास चालू आहे.
    ही कामगिरी गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश माने, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस अंमलदार मच्छिद्र वाळके, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, प्रतीक लोहिगुडे, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन घाडगे व सुहास तांबेकर यांनी केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *