अतुल देशपांडे,
सातारा, (हवेलीनामा प्रतिनिधी) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनापूर्ण ताकदीने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत उतरली आहे. आमचे पहिले प्राधान्य महायुतीला असेल. आजपर्यंत आम्ही महायुतीतील दोन्ही पक्षांचा सन्मान राखला आहे. आता त्यांनी या निवडणुकीत आमचा सन्मान राखावा; पण जागा वाटपात आम्हाला योग्य वाटा मिळणार नसेल, तर आमच्यापुढे इतर पर्याय खुले असतील, असा सूचक इशारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना दिला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या नियोजनाची बैठक पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी आमदार महेश शिंदे, संजीवराजे नाईक निंबाळकर,राजेंद्रसिंह यादव, रणजितसिंहभोसले, चंद्रकांत जाधव,अनिकेतराजे निंबाळकर,रेश्मा जगताप, शारदा जाधव,नीलेश मोरे यांच्यासह प्रमुखपदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी शिवसेना पूर्ण ताकदीने रणांगणात उतरली आहे. आम्ही महायुतीत असलो, तरी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत आम्ही सक्रिय राहणार आहोत. त्या कालावधीत आमचा सन्मानराखत योग्य जागा वाटप व्हायल हवे. आम्हाला योग्य जागा देऊन सन्मान झाला, तर ठीक अन्यथ आम्ही पूर्ण ताकदीने स्वबळाव लढणार आहोत. युतीबाबत आमचे वरिष्ठ नेते मित्रपक्षांशी चर्चा करू निर्णय घेतील. त्यासाठी आमच्च विधानसभानिहाय एक प्रतिनिधी याबाबत चर्चेत सहभागी होईलमित्रपक्षांना आमच्याशी चर्चा करण्यासाठी दारे उघडी आहेत. आजपर्यंत आम्हाला भाजप किंवा राष्ट्रवादीकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असे सांगून मंत्री देसाई म्हणाले, “शिवसेना निवडणुकीत उतरली, की काय होते हे पालिकेच्या निवडणुकीत सर्वांनी पाहिले आहे. फलटणमध्ये आम्ही थोडे कमी पडलो. आता या निवडणुकीत आम्ही सर्व तयारीनिशी रिंगणात उतरणार आहोत. महायुतीशी चर्चा फिसकटली, तर आम्हापुढे इतर पर्याय खुले आहेत, असा सूचक इशारा त्यांनी घटक पक्षांना दिला.”
