मंचर (हवेलीनामा ऑनलाईन)    पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील एकलहरे सुलतानपुर रोडवर अपघाताचा बनाव करत ५१ वर्षीय व्यक्तीची धारधार शस्राने वार करत हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे .
                प्राथमिक माहितीनुसार हत्या केलेल्या व्यक्तीचा अपघाताचा आरोपींकडून बनाव करण्यात आलाय. जमिनीच्या वादातुन हि हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून हत्या करत अज्ञात आरोपी फरार झाले आहेत .मंचर पोलीस आणि पुणे ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून संजय वायाळ राहणार फकिरवाडी,एकलहरे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. एकलहरे ग्रामपंचायत हद्दितील अतीक्रमणे काढावी याकरता संजय वायाळ पाठपुरावा करत होते याचाच राग मनात धरुन आरोपींनी हत्या केली असल्याचे नातेवाईक सांगत आहेत.दरम्यान आंबेगाव तालुक्यात दोन दिवसात दोन खून झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *