थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) प्रकाशशेठ सावंत प्रतिष्ठान आणि योगेश नाना काकडे युवा मंच आयोजित,हळदी कुंकू व होमिनिस्टर खेळ खेळूया पैठणीचा या लाडक्या बहिणींसाठी आयोजित कार्यक्रमात महिलांनी अलोट गर्दी केली होती आणि या आगळयावेगळ्या कार्यक्रमाची रंगत वाढवली.

थेऊर – आव्हाळवाडी पुणे जिल्हा परिषद गट क्रमांक ४० मधील कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबाची या गावांतील महिला भगिनींसाठी आयोजित या कार्यक्रमासाठी प्रमुख आकर्षण ठरल्या त्या सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड त्यांनी साकारलेल्या श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांची भूमिका त्यातून साकारलेली महाराष्ट्रीयन स्त्री हे प्रत्येक महिलेला साद घालणार व्यक्तिमत्व उपस्थित असल्यामुळे महिलांमध्ये नविन उभारी देणारे ठरले.

निवेदक संदेश चौधरी यांची चतुरस्त्र भाषशैली लाडक्या बहिणीमध्ये स्पर्धात्मक भाव निर्माण करणारी ठरली. सर्वत्र कला मंचावर एकच नाद दनानून जाताना दिसत होता.या स्पर्धेसाठी एकूण ४ इलेक्ट्रिक दुचाकी वाहनाबरोबरच खुपसारी अन्य बक्षिसे असल्यामुळे महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. आलेल्या स्पर्धक भगिनींसह सुमारे ६००० नागरिकांची भोजन व्यवस्था करण्यात आली होती.
यात सहभागी प्रत्येक भगिनींना एक एक आकर्षक भेटवस्तू देण्यात आली.

कार्यक्रम जासजसा रंगत होता तशी धमाल, मस्ती, विनोद, नृत्य, अभिनय याची मेजवानी आणखी खुलत जात होती. त्यामुळेच उपस्थितामधील बऱ्याच मान्यवर मंडळींनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रतिष्ठान च्या कामचे मनापासून कौतुक केले आणि इच्छुक उमेदवारांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी मंचावर प्रतिष्ठान चे सर्वेसर्वा श्री प्रकाशशेठ सावंत,जिल्हापरिषद उमेदवार सौ पुष्पलता प्रकाश सावंत, पंचायत समिती उमेदवार श्री योगेश दत्तात्रय काकडे आणि सौ पूनम अशोक गायकवाड यांनी सर्वांना अभिवादन आणि आभार मानले.
