थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) हवेली तालुक्यातील एक छोटासा गाव आणि या गावचे सुपुत्र प्रकाशशेठ सावंत यांच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित वंचित बेरोजगार तसेच शेतकरी यांच्या सर्वांगीण विकासाची आस मणी बाळगून गेली वीस पंचवीस वर्षांमध्ये हवेली तालुक्यातील अनेक गरजूंना मदतीचा हात देऊन प्रकाशशेठ सावंत प्रतिष्ठान आपले मार्गक्रमण करीत आहे.
प्रकाश वसंत सावंत हे एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तिमत्व गेल्या 25 वर्षांपूर्वी स्थानिक राजकारणामध्ये उतरले त्यानंतर तालुका पातळीवरील काम करत असताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून निवड झाल्यानंतर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी भरीव काम केले शेतकऱ्यांनी आपल्या शेतात उत्पादित केलेल्या भाजीपाला योग्य मोबदला मिळावा म्हणून त्यांनी काम केले तर मांजरी खुर्द ग्रामपंचायतच्या निवडणुकीत एक सक्षम नेतृत्व उभे करून आपल्या सहकाऱ्यांच्या गळ्यामध्ये विजयाची माळ घातली.
राजकारण यातूनच समाजकारण हा एकमेव मार्ग पत्करलेल्या सावंत यांच्याकडून गावातील विविध विकास सोसायटीच्या चेअरमन पदी नियुक्ती झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या विविध अडचणी लक्षात घेऊन त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले युवकांमधील नेतृत्व गुण तपासून त्यांना योग्य संधी उपलब्ध करून दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांना पक्षाशी जोडून पक्ष बांधणीत कार्य केले याचीच पावती म्हणून हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी सुरुवातीच्या काळात मिळाली या माध्यमातून पूर्व हवेलीतील अनेक गावांशी संपर्क साधून कार्यकर्त्यांची फळी उभी केली संघटन कौशल्य निर्माण केले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवला याचीच परिणती म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा सरचिटणीस पदी कार्य करण्याची संधी वरिष्ठानकडून देण्यात आली.
सौ पुष्पलता प्रकाश सावंत यांनी आपल्या पतीसोबत खांद्याला खांदा लावून समाजसेवेत स्वतःला झोकून दिले प्रत्येक कार्यात मदत केली त्या स्वतः उच्चशिक्षित असून समाजकार्याची मोठी आवड त्यांच्या अंगी आहे यातूनच स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत निवडणूक लढवून मांजरी खुर्द गावच्या उपसरपंच पदाची जबाबदारी सार्थपणे सांभाळून गावच्या सर्वांगीण विकासात मोठा हातभार लावला. मांजरी खुर्द येथे शिवछत्रपती कुस्ती संकुल ही संस्था उभी करून समाजातील सर्वसामान्य कुटुंबातील मुला मुलींसाठी कुस्तीचे मैदान उपलब्ध करून दिले. सौ पुष्पलता सावंत ह्या गेल्या नऊ वर्षापासून या संस्थेवर सचिव म्हणून कार्यरत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुणे जिल्हा परिषद थेऊर आव्हाळवाडी गटासाठी इतर मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असलेल्या जागेवर सौ पुष्पलता प्रकाश सावंत यांनी निवडणूक लढविण्याची मानसिकता केली असून यासाठी मांजरीसह आव्हाळवाडी, कोलवडी, थेऊर, कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबा या गावामधून त्यांना मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
