थेऊर (हवेलीनामा वृतस मूह) श्रीक्षेत्र थेऊर येथील श्री खडकेश्वर महादेव मंदिरातील साडेसात किलो वजनाची घंटा अज्ञात चोरट्याने पळवली त्यामुळे भाविकांमध्ये एकच खळबळ उडाली.

तीर्थक्षेत्र थेऊर हे अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असून राज्याच्या विविध भागातून भाविक श्री चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी येथे येत असतात थेऊर हे ऐतिहासिक तसेच पौराणिक महत्त्व प्राप्त असणारे तीर्थक्षेत्र असून या गावात अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत विशेष करून महादेवाची अति प्राचीन मंदिरे असून त्यापैकी एक असलेले श्री खडकेश्वर महादेव मंदिर आहे हे मंदिर गावच्या पश्चिमेला असून यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या हद्दीमध्ये मुळा मुळा नदीच्या तीरावर आहे लोकवस्ती पासून दूर असल्याने व रमणीय असल्याने या ठिकाणी भाविक दर्शनासाठी येतात विशेषतः श्रावण महिन्यात व महाशिवरात्रीच्या दिवशी या ठिकाणी मोठी गर्दी होते या देवतेवर अनेकांची मोठी श्रद्धा असून काही भाविकांनी या मंदिरामध्ये साडेसात किलो वजनाची घंटा प्रदान केली होती परंतु ही घंटा काही अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना उघडकीस आली आहे त्यामुळे भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचे दिसून येते यावर पोलीस प्रशासनाने कारवाई करून संबंधित चोरट्यांना जर बंद करावे अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *