अतुल देशपांडे यांजकडून,
स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी,सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) “तू स्वप्नांना बळ दे .मी संसाराला ठिगळ लावतो जमलं तर संध्याकाळी च्या भाकरीचा मेळ लावतो.” असे भाकरीचा मेघ या विषयावरील कविता डॉ.विजय काळे यांनी सादर करून कवी संमेलनात आपला वेगळा ठसा उमटविला .
सातारा येथील ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उद्घाटन नंतर मुख्य मंडपात आणलेल्या कवी संमेलनामध्ये अनेक नामवंत कवींनी आपल्या भावनांना कवितातून वाट मोकळी करून दिली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातारा जिल्ह्यातील वाई येथील ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती .कविता ऐकण्यासाठी विठ्ठल वाघ, माजी आमदार कांता नलावडे ,इंद्रजीत भालेराव रयत शिक्षण संस्थेचे सचिव आणि माजी आयुक्त चंद्रकांत दळवी यासारख्या मान्यवरांसोबत हजारो कविता प्रेमींची यावेळी उपस्थिती होती. प्रदीप कांबळे यांच्या सूत्रसंचालनाने या कवी संमेलनाला तब्बल चार तासांची वेळ लागत विविध विषयावरील कवितांचे सुरेख सादरीकरण झाले .या कार्यक्रमात अशोक नायगावकर यांचा संयोजकांच्या वतीने कंदीपेढ्याचा हार तसेच शिवतीर्थावरील छत्रपती शिवरायांची भव्य प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या सुविद्य पत्नी शोभाताई नायगावकर यांनाही गौरविण्यात आले .
सातारा येथील साहित्य संमेलनामध्ये या कवी संमेलनाची सुरुवात कवी अशोक नायगावकर यांनी मराठीची मुक्ताक्षरे आपण विसरत चाललोय याने सुरुवात करत तेव्हा क कमळाचा होता .थ खरा वाटायचा थुई थुई मोरासारखा नाचायचा , प परत ये परत ये म्हणत पारंबीवर राहायचा. फ फावल्या वेळाचा होता अशी ही सगळी मुळाक्षरे बाराखडी मोजत बसले आहेत ,असे सांगून या कवी संमेलनाला प्रारंभ केला.
त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील सुनील उबाळे यांच्या माझ्या उलट्या कडीचे घर सादर होताना ..लोक भलेही लपवून ठेवू त्यात सोने आणि ताळेबंद मी खेळत्या वयात भाकरी लपवली उद्यासाठी.. यातून आपल्या जीवनाचे दर्शन घडवले .धाराशिव येथील डी. के. शेख यांनी.. तुझ्यामुळे घे ,तुझ्यामुळे ..डोक्यावरचे केस गळाले.. सादर करताना संपूर्ण मंडपात हशा पिकला. आणि अखेर अशोक नायगावकरांनी उभा राहून प्रतिभावंत तुम्ही कवी ,बायको मुळे तुम्हाला केस पुन्हा येवत अशी सदिच्छा दिली. त्यानंतर अनिता एलबोटे यांची पूर्वीसारखी आजी आता लावत नाही कडी कुलूप ..ज्योती कपिले यांचा ..मोकळा आभाळ ..कमलाकर राऊत यांचा मिळे मानवी जन्म एकदा धरतीच्या दरबारी.. सादर होताना मनोज वराडे यांनी .. नाय जीव देणार नाही ही देवाला साद घालणारी कविता सादर केली.
त्यानंतर चंद्रपूरच्या प्रदीप देशमुख यांनी वऱ्हाडी भाषेतील ..असा आयुष्य वढाय चाले म्हणाले मोडून.. सादर करताना उपस्थित मान्यवरांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले .गडचिरोली येथील चुडामण बल्लारपुरे यांनी रानगर्भातील रानफुले विदर्भी ठोक्यात सादर केली .तर सुनील यावलीकर यांनी.. नाकर्त्यांना युद्धाशिवाय दुसरा पर्याय नसतो ..ही अतिशय परखड भाषेत आपली कविता सादर केली. भोपाळ येथून आलेल्या आणि मृदुल भाषेत अगदी दुबईतही कविता सादर करणाऱ्या विवेक सावरीकर यांनी या संमेलनात.. मन माझे मराठी देशपालथा केला फिरता फिरता, अजूनच शोधतो आईची उशी ,क्रोकरी जरी किमती असली तरी आवडते कपबशी.. ही सुरेख कविता सादर केली .यावेळी सातारच्या माहेरवाशीन आणि माजी आमदार कांता नलावडे यांनी मुक्तछंदातील सामाजिक प्रश्नावर ज्यामध्ये अगदी मागील डिसेंबर महिन्यात 30 ठिकाणी मुलींवर अत्याचार झाले याबद्दल देवाला आव्हान करणारी यक्षप्रश्न ही कविता सादर करून अनेकांच्या मनाला हात घातला
