अतुल देशपांडे
सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) नगरपरिषदेचे नूतन नगराध्यक्ष म्हणून अमोल मोहिते यांनी तब्बल ४२ हजार ४० मतांनी आघाडी घेत सातारा नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये विक्रमी मतांची आघाडी घेऊन संपूर्ण राज्यात विक्रम नोंदवला आहे .राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक असलेल्या अमोल मोहिते यांनी हा विक्रम नोंदवलेला आहे. या निवडणुकीत त्यांचे विरोधात भाजपमधूनच राष्ट्रवादी शरद पवार पक्ष गटात गेलेल्या सुवर्ण ताई पाटील यांना केवळ १५ हजार ५५६ मते मिळवता आली . हा दणदणीत मताधिक्याचा आकडा संपूर्ण राज्यात विक्रमी ठरला
त्यामुळे संपूर्ण सातारा शहरात विजय मिरवणुका काढून गुलालाची उधळण करत आणि फटाक्यांचे आत्ताशीबाजी करत हा विजय त्यांच्या समर्थकांनी साजरा केला सातारचे विद्यमान खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही अमोल मोहिते यांचा विशेष सत्कार केला यावेळी श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच भाजपचे जुने जाणते समर्थक आणि पदाधिकारी दत्ताजी थोरात यांची उपस्थिती होती
