किरण खुडे

राजगुरुनगर : (हवेलीनामा वृतसमूह) : पर्यावरणपूरक उपक्रमांना चालना देण्यासाठी व ग्राहकांच्या आर्थिक बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी येथील राजगुरुनगर सहकारी बँकेने सौरऊर्जा योजनेबाबत मार्गदर्शक दिनदर्शिकेचे प्रकाशन जेष्ठ नागरिक सभासदांच्या हस्ते केले.

यावेळी बँकेचे अध्यक्ष सागर पाटोळे, उपाध्यक्षा अश्विनी पाचारणे, संचालक किरण आहेर, राजेंद्र सांडभोर, अविनाश कहाणे, राहुल तांबे, विजया शिंदे, समीर आहेर, अरुण थिगळे, रामदास धनवटे, सचिन मांजरे, धर्मेंद्र खांडरे, ज्येष्ठ नागरिक संघाचे जि. र. शिंदे (गुरुजी), महादेव नेहरे, राजन जांभळे, शिवाजी गव्हाणे, बाळासाहेब दाभाडे, हिरामण पडवळ आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना अध्यक्ष सागर पाटोळे म्हणाले, आजच्या काळात नवीनीकरणीय ऊर्जेचे महत्त्व खूप वाढले आहे. सौरऊर्जा प्रकल्प उभारणीला प्रोत्साहन देण्यासाठी बँक दिनदर्शिकेसह विशेष कर्जयोजना आणत आहे. यामुळे ग्राहकांना कमी खर्चात सौर पॅनेल बसवता येतील आणि दीर्घकाळात वीजबिलात मोठी बचत होईल. बँक सौरऊर्जा प्रकल्पांसाठी ग्राहकांना सुलभ आणि कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा बँकेच्या २०२६ या दिनदर्शिकेच्या या प्रकाशन कार्यक्रमात करण्यात आली.

कार्यक्रमासाठी बँकेचे सभासद आणि ग्राहक उपस्थित होते. कार्यक्रमात दिनदर्शिकेचे वितरण करण्यात आले. तसेच सौरऊर्जा योजनेबाबत ग्राहकांना मार्गदर्शनही करण्यात आले. बँकेचे मुख्याधिकारी शांताराम वाकचौरे आणि व्यवस्थापक संजय ससाणे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *