पुणे (हवेलीनामा वृतसमूह) जेजुरी पोलीस स्टेशन मधील पोलीस हवालदार व खाजगी इसम यांनी गेट वारंट रद्द करण्यासाठी दोन हजार रुपयाची मागणी केल्याने त्यांच्या विरोधात लाचमागणी प्रकरणी कारवाई करण्यात आली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दशरथ शिवाजी बनसोडे, वय 57 वर्ष, व्यवसाय नोकरी पद पोलीस हवालदार, जेजुरी पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण

आणि सचिन अरविंद चव्हाण रा.वी. चव्हाण वस्ती, वाल्हा, ता. पुरंदर जि.पुणे. (खाजगी इसम) यांचे विरुद्ध लाच मागणी केलेली आहे.

थोडक्यात माहिती अशी की, तक्रारदार यांचे मुलाने सन 2019 मध्ये एका इसमाविरोधात जेजुरी पोलीस ठाणे येथे सावकारकीच्या कायद्याखाली गुन्हा दाखल केला होता त्या गुन्ह्यामध्ये तक्रारदार व तक्रादाराची पत्नी असे दोन साक्षीदार होते. दि.5/12/2025 रोजी सचिन चव्हाण व पोलीस हवालदार दशरथ बनसोडे हे तक्रारदाराच्या घरी आले होते तेव्हा त्यांनी तक्रारदार व तक्रारदाराची पत्नी विरुद्ध सन 2019 मध्ये तक्रारदाराच्या मुलाने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये गेट वारंट निघालेले असून ते रद्द करण्यासाठी दोन हजार रुपयाची लाच मागितल्याची तक्रार तक्रारदार यांनी दि.10/12/2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथे दिली.

तक्रारीच्या अनुषंगाने दि. 10/12/2025 रोजी लाच मागणी पडताळणी कारवाई केली असता पडताळणी दरम्यान लोकसेवक पोलीस हवालदार बनसोडे यांनी तक्रारदाराकडे त्यांच्या व त्यांची पत्नी विरुद्ध निघालेले जामीनपात्र वॉरंट रद्द करून देण्यासाची 2 हजार रुपयाची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले तसेच पोलीस सचिन चव्हाण (नंतर खाजगी इसम म्हणून निष्पन्न झाले) याने तक्रारदारास लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले असून दोन्हीना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध जेजुरी पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण येथे गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, पुणे व अपर पोलीस अधीक्षक अजीत पाटील, ला.प्र.वि. पुणे, अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले, ला.प्र.वि. पुणे, यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *