पुणे (हवेलीनामा वृतसमूह) मंगळवार पेठ येथील घराच्या बंद दरवाजाचे कुलुप तोडुन घरातील ७,२९,०००/-रुपये किंमतीचे सोन्याचे, चांदीचे दागीणे व रोख रक्कम चोरीचा गुन्हा समर्थ पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला होता त्यामधील दोन व्यक्तींना ताब्यात घेऊन चोरीस गेलेला एकुण ८,११,०००/- रु.कि.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
समर्थ पोलीस स्टेशन कडील तपासपथक तसेच गुन्हे शाखा समांतर तपास करीत असताना घटनास्थळावरील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज तपासुन तसेच बातमीदार यांचेकडुन माहीती प्राप्त करुन सुनिल मल्हारी तलवारे वय ३८ वर्षे रा. केएसबीचौक अजंठानगर मजिदजवळ आकुर्डी पुणे व विधीसंघर्षीत बालक यास ताब्यात घेवुन त्यांचेकडे तपास केला असता वरीलप्रमाणे गुन्हा केला असल्याचे कबुल करुन गुन्हयातील चोरी केलेले सोन्याचे दागीणे त्यांचा साथीदार शिवानंद दशरथ मोची याचेकडे विक्री करीता दिले असल्याची माहीती दिले त्यानुसार शिवानंद दशरथ मोची याचा पिंपरी चिंचवड परीसरात शोध घेवुन त्यास ताब्यात घेवुन १) सुनिल मल्हारी तलवारे वय ३८ वर्षे रा. केएसबी चौक अजंठानगर मजिदजवळ आकुर्डी पुणे व २) शिवानंद दशरथ मोची उर्फ मोची मामा वय ४० वर्षे, रा. भिमशक्तीनगर, मोरेवस्ती, चिखली, ता. हवेली, जि. पुणे यांना दाखल गुन्हयात अटक करुन त्यांचेकडे सखोल तपास करुन त्यांचेकडुन दाखल गुन्हयातील चोरी केलेले सोन्याचे व चांदीचे दागीणे तसेच १०,०००/- रुपये रोख रक्कम असा एकुण ८,११,०००/- रु.कि.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तपासामध्ये त्यांनी खराडी पोलीस स्टेशन, चंदनगर पोलीस स्टेशन व महाड शहर पोलीस स्टेशन जि. रायगड हद्दीत देखील घरफोडीचे गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाले आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे राजेश बनसोडे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-०१, पुणे शहर, कृषिकेश रावले, सहा. पोलीस आयुक्त फरासखाना विभाग, पुणे शहर अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक समर्थ पोलीस स्टेशन, उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) चेतन मोरे, यांचे मार्गदर्शनानुसार वाहन चोरी व दरोडा पथक २ कडील सहा. पोलीस निरीक्षक बेरड, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे, पोलीस अंमलदार अमोल गावडे, इम्रान शेख, शरद घोरपडे, भाग्येश यादव, विक्रांत सासवडकर, विनायक येवले यांनी केली आहे.
