थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) गेली सप्ताहभर नामसंकीर्तनाने उजळून निघालेल्या थेऊर येथील अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता ह भ प आसाराम महाराज बढे यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली.यावेळी वारकरी संप्रदायातील अनेक महान विभूती उपस्थित होत्या.

थेऊर येथील श्री विठ्ठल रुख्मिणी मंदितात चिंतामणी ग्रामविकास प्रतिष्ठान आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. गेली २६ वर्षे हा सप्ताह अखंडितपणे चालू आहे. हे २७ वे वर्ष आहे.

मार्गशिर्ष शु. ५ पासून मार्गशिर्ष शु.१२ या दरम्यान हा सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. यामध्ये पहाटे काकडा,ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण, हरिभजन, हरिपाठ, कीर्तन आणि हरिजागर असे कार्यक्रम पार पडतात.

संपूर्ण सप्ताहत थेऊर व पंचक्रोशीतील भाविकांनी या भक्तीरसाचा आस्वाद घेतला. वेगवेगळ्या संताच्या अभंगातून जीवनाचे सार्थक करून घेण्यासाठी ज्या मार्गाचा अवलंब करावा याबद्दल संतांनी आपल्या कीर्तनातून अनेक दाखले देत मार्गदर्शन केले. मानवी जीवनाचे खरे उद्दिष्ट काय आहे यांचे विवेचन केले.

सांगता सोहळ्याच्या कीर्तनात हभप बढे महाराज यांनी भगवान श्रीकृष्ण लिलाचे वर्णन करताना त्यांनी सांगितलेल्या भगवतगीतेतील ज्ञानाचा आपल्या जीवनात अवलंब करावा हे सांगितले.

यावेळी महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधीक मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, ग्रामविकास प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष माऊली कुंजीर, वारकरी साहित्य परिषद हवेली तालुका अध्यक्ष विठ्ठल गावडे, मल्हारी गावडे, ह भ प भोर महाराज चंद्रकांत जगदाळे, बंडू महाराज अभंग, पसायदान वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रंगनाथ महाराज चौधरी व त्यांचे बाल भजनी तसेच भाऊसाहेब कंद,नरसिंग सुरवसे,सुदाम काळे,चिंतामणी तारू, आनंद तांबे,एकनाथ काळे,वैभव बडदे, विजय कुंजीर, दादा लोंढे व मोठया संख्येने भाविक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *