पुणे (हवेलीनामा वृतसमूह) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत गाव पुढार्यांची आवश्यकता इच्छुक उमेदवारांना राहिलेली नाही प्रचार यंत्रणेची जबाबदारी आता सर्वसामान्य युवा कार्यकर्त्यांवर येऊन पोहोचलेली आहे गावातील वाड्या वस्त्यांवर वेगवेगळ्या तरुण मंडळांच्या माध्यमातून तसेच सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून पुढे आलेल्या सर्व सामान्य युवा कार्यकर्त्यांची मोठी फळी या निवडणूक प्रक्रियेमध्ये सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे त्यामुळे परंपरागत गाव पुढारी मात्र या निवडणूक प्रक्रियेमध्ये कोसो दूर असल्याचे दिसून येत आहे.
अलीकडच्या काळामध्ये निवडणुकांचे सर्व तंत्र बदलल्याने मतदारांना आपलेसे करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या क्लुप्त्या वापरल्या जात आहेत बहुतेक मतदार हा सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने त्यांच्या गरजा ह्या मर्यादित असतात मिळणाऱ्या उत्पन्नातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे हा एकमेव पर्याय त्यांच्याकडे असतो अशावेळी निवडणूक कार्य काळामध्ये इच्छुक उमेदवार आमच्या माध्यमातून होणाऱ्या देण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या भेटवस्तू तसेच देवदर्शन ही अलीकडे प्रचलित झालेली निवडणुकीची पद्धती खूपच प्रसिद्धीस पावलेली आहे त्यामुळे निवडणूक काळामध्ये वेगवेगळ्या प्रसिद्ध देवस्थानच्या दर्शनाची व्यवस्था करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची जणू काही स्पर्धाच लागण्याचे चित्र सर्वत्र अनुभवास येत आहे.
तीर्थयात्रांच्या आयोजनांमुळे अनेकांना काम तर मिळतेच परंतु सार्वजनिक वाहतुकीच्या व्यवस्था असलेल्या रेल्वे व खाजगी बस चालक यांच्यासाठी मात्र मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायद्याची ठरत आहे शेकडो खाजगी बसेस भाड्याने घेऊन या मतदारांना देवदर्शनाची सोय केली जात आहे.
या सर्व प्रचाराच्या धुराळामध्ये स्थानिक गाव पुढारी मात्र कुठे दिसेनासे झालेले आहेत. इच्छुक उमेदवार आपल्या काही सवंगड्यांसह घरोघरी जाऊन मतदारांना आपल्या कामांच्या बद्दल माहिती देऊन भविष्यात संधी दिल्यास आपण आपल्यासाठी काय वेगवेगळ्या योजना राबवणार याबद्दल सविस्तर माहिती देताना दिसत आहेत निवडणुकीचे वेळापत्रक जरी जाहीर झालेले नसले तरी सुरुवात मात्र झपाट्याने झाल्याचे दिसून येते जवळपास तीन वर्ष जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुका झालेल्या नाहीत त्यामुळे प्रत्येकाला याबद्दल उत्सुकता लागलेली आहे.
आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी मतदारांचे उंबरे झिजवण्यास सुरुवात केली आहे आणि आपणच किती योग्य उमेदवार आहोत हे दाखवून देण्यासाठी कसोशीने प्रयत्न केला जात आहे.
