मुंबई (हवेलीनामा वृतसमूह ) राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना भाऊबीज म्हणून महाराष्ट्र शासनाकडून तब्बल दोन ह जार रुपये भाऊबीज देण्याची घोषणा महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केली आहे त्यामुळे राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यात आनंदाचे वातावरण अनुभवास येत आहे.
ग्रामीण भागाचा शैक्षणिक सुरुवात म्हणून पहिल्या जाणाऱ्या अंगणवाडी मध्ये काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे कार्य हे असामान्य असून त्यांच्याकडून समाजातील गरीब व दुर्बल घटकातील लहान मुले शिक्षणाची बाराखडी शिकण्यासाठी येतात या लहानग्यांना शिक्षणाबरोबरच संस्काराचे बाळकडू या सुरुवातीच्या कालावधीतच या अंगणवाडी सेविका करत असतात त्यामुळे हा समाजाशी जुळलेला पहिला घटक आहे आणि त्यांना दिवाळी भेट म्हणून शासनाकडून दोन हजार रुपये भाऊबीज जाहीर करण्यात आली आहे.
