पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) नाशिक येथील भद्रकाली उपविभाग टिळेकरवाडी वीज कर्मचारी बाळकृष्ण कचरु तुपे कर्तव्यावर असताना सन २००९ च्या पहिल्या आठवड्यात जेजुरकरवाडी येथील सोसायटीत वीजमीटर बदलण्यासाठी गेले असता अतुल अंबादास पवार याने “तुम्ही कोणाला विचारुन मीटर बदलत आहात” असे बोलून गचांडीला धरुन शिवीगाळ केली व लाथ मारुन सरकारी कामात अडथळा आणला हा गुन्हा सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता, या गुन्हाचा तपास तत्कालीन सरकारवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक संदीप कांबळे त्यांनी गुन्हेगाराविरोधातील सर्व पुरावे गोळा करुन न्यायालयात सादर केले व गुन्हा साबित होण्याच्या दृष्टीने मेहनत घेऊन अत्यंत चिकाटीने तपास केला जिल्हा व सञ न्यायालय नाशिक येथे दोषारोप पञ दाखल केले यांचा निकाल परवाच लागला, जिल्हा व सञ न्यायालयाचे क्र.७चे न्यायाधीश आर एम शिंदे यांनी सर्व पुरावे साक्ष व अंलदारांनी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्या नुसार आरोपीस एक वर्ष सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
सरकारी पक्षातर्फे अभियोक्ता म्हणून आर वाय सुर्यवंशी यांनी काम पाहिले पैरवी आधिकारी म्हणून पोलिस हवालदार एम ए पवार व कोर्ट अंमलदार आर आर जाधव यांनी शिक्षा लागण्याच्या दृष्टीने वेळोवेळी पाठपुरावा केला.
शासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध अगदी टोकाची भूमिका घेणे ही जेलची हवा दाखवू शकतो हे या निकालातून स्पष्ट झाले अनेक जण आततायीपणा करत कायदा हातात घेतात परंतु योग्य पोलिसिंग झाले तर आरोपीस योग्य शिक्षा होते या निकालानंतर नाशिक चे पोलीस आयुक्त, गुन्हे शाखेचे उपायुक्त, विशेष शाखा परिमंडळ १ चे उपायुक्त यांनी या सर्व टीमचे कौतुक केले.
