पुणे (हवेलीनामा वृतसमूह) अनैतिक संबंधास अडसर ठरणाऱ्या नवऱ्याचा प्रियकाराच्या मदतीने झोपलेल्या अवस्थेतच खून केला या घटनेनंतर लोणी काळभोर परिसरात एकच खळबळ उडाली.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,लोणीतील वडाळेवस्ती येथे रात्रीच्या झोपेत एका व्यक्तीचा डोक्यात आघात करून खून झाल्याची घटना घडल्याची माहिती सकाळी सातच्या सुमारास पोलिसांना कळली, याची माहिती मिळताच लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी आपल्या सहकाऱ्यासह घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली आणि तपासाची चक्रे फिरवून अवघ्या तीन तासांत आरोपींना शोधून काढण्यात पोलिसांना यश आले. शोभा रविंद्र काळभोर (वय ४२) व प्रियकर गोरख त्र्यंबक काळभोर (वय 41, रा. लोणी काळभोर, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पती अनैतिक संबंध ठेवण्यात अडसर ठरत असल्याने पत्नीने प्रियकराच्या यात मदतीने काढला काटा बायकोने संगनमताने प्रियकराच्या मदतीने झोपलेल्या अवस्थेत असलेल्या नवऱ्याच्या डोक्यात फोवड्याने वार करुन खून केला.या घटनेत रविंद्र काशिनाथ काळभोर (रायवाडी रोड वडाळेवस्ती) यांचा खून झाला.

घटनास्थळी लोणी काळभोर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असता, शोभा काळभोर हीचे गोरख काळभोर यांच्याशी अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने दोन्ही संशयिताना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, अनैतिक संबंधात अडसर होत असल्याने रवींद्र काळभोर यांचा कायमचा काटा काढायचा संगनमत करून सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमरास रवींद्र काळभोर हे पलंगावर झोपलेले असताना त्याच्या डोक्यात फावड्याने वार करून खून केला, अशी कबुली त्यांनी पोलिसांना दिली, पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा प्रकार हा अतिशय गुंतागुंतीचा व क्लिष्ठ स्वरुपाचा असताना देखील लोणी काळभोर पोलीसांनी अवघ्या ३ तासांच्या आतमध्ये गुन्हेगार शोधून काढले.

ही कामगीरी पोलीस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस उप निरीक्षक अनिल जाधव, उदय काळभोर, सर्जेराव बोबडे, रत्नदिप बिराजदार, दिगंबर सोनटक्के, पुजा माळी, संभाजी देवीकर, विलास शिंदे, रामहरी वणवे, नागलोत, रामदास मेमाणे, बाजीराव विर, चक्रधर शिरगीरे, राहुल कर्डीले, प्रदीप गाडे, सुरज कुंभार, सचिन सोनवणे, विशाल बनकर, शिवाजी दरेकर, अजिंक्य जोजारे, संदीप धुमाळ, महिला पोलीस ज्योती नवले, उषा थोरात यांच्या पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *