थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून अवैध धंदे हद्दपार करण्याच्या सूचना दिल्यानंतर देखील काही भागात मटका, जुगार हातभट्टी अशा अवैध धंद्यावर कारवाई होताना दिसत नव्हती परंतु लोणी काळभोर पोलीस स्टेशन चा कार्यभार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी घेतल्या नंतर हद्दीतील अवैध धंदेवाईकांचे कंबरडेच मोडल्याचे चित्र आहे. परिणामी मटका शौकीन मात्र हवालदिल झाले यावर नामी शक्कल काढून आपला मोर्चा केसनंदकडे वळवला आहे. त्यामुळे येथे चालू असलेल्या अवैध धंद्याला कोणाचे अभय आहे हा प्रश्न निर्माण होतो आहे.

सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्यासाठी अवैध धंदे कारणीभूत ठरतात त्यासाठीच पोलीस आयुक्त यांनी याचा बंदोबस्त करण्याच्या सूचना दिल्यानंतर देखील काही भागात हे धंदे चालू असतात. जगार, मटका, हातभट्टी यामुळे कौटुंबिक कलह वाढतात.अनेकांचे संसार उध्वस्त होतात याला आवर घालणे आवश्यक आहे.

लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील जवळपास सर्वच गावातून मटका हद्दपार झाल्यावर मटका शौकीनाची अडचण झाली त्यावर काही जणांशी संवाद साधल्यावर सांगितले की, खूप अडचण आहे पण जवळच केसनंद मध्ये सोय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *